मराठी बातम्या /बातम्या /देश /

घाम, रक्त आणि निष्ठेचं द्योतक असलेली पादत्राणंही....! मराठा शेतकऱ्याच्या वंशातून असं घडलं ग्वाल्हेरचं शिंदे घराणं

घाम, रक्त आणि निष्ठेचं द्योतक असलेली पादत्राणंही....! मराठा शेतकऱ्याच्या वंशातून असं घडलं ग्वाल्हेरचं शिंदे घराणं

Madho Rao Scindia: सर्वसामान्य मराठा शेतकऱ्यांचे वंशज असलेलं ग्वाल्हेरचं (Gwalior)  शिंदे घराण्याचा काय होता इतिहास. थोडक्यात जाणून घेऊया.

Madho Rao Scindia: सर्वसामान्य मराठा शेतकऱ्यांचे वंशज असलेलं ग्वाल्हेरचं (Gwalior) शिंदे घराण्याचा काय होता इतिहास. थोडक्यात जाणून घेऊया.

Madho Rao Scindia: सर्वसामान्य मराठा शेतकऱ्यांचे वंशज असलेलं ग्वाल्हेरचं (Gwalior) शिंदे घराण्याचा काय होता इतिहास. थोडक्यात जाणून घेऊया.

नवी दिल्ली, 24 जून: शिंदे घराण्याचे पूर्वज कोणी दिग्गज नसले, तरी आपल्या पूर्वजांचा त्यांना अभिमान होता. आपण सूर्यवंशी किंवा चंद्रवंशी आहोत, असे दावे करणाऱ्या सरंजामशाही राजांपैकी ते नव्हते. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा इतिहास, त्यांच्या निष्ठेची कथा ज्येष्ठ पत्रकार रशीद किदवई यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या  'द हाउस ऑफ सिंधियाज: ए सागा ऑफ पॉवर, पॉलिटिक्स एंड इंट्रीग' यात आली आहे.

'काही राजे, युवराज सूर्याचे किंवा चंद्राचे वंशज असल्याचे दावे करतात. आम्ही भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांचे वंशज आहोत, या गोष्टीचा मला अभिमान आहे. स्वतःच्या रक्ताचं पाणी करून, घाम गाळून मोठ्या झालेल्या सर्वसामान्य मराठा शेतकऱ्यांचे आम्ही वंशज आहोत,' असं ग्वाल्हेरचे (Gwalior) पाचवे महाराज माधोराव शिंदे (Madho Rao Scindia) (ऑक्टोबर 1876 - जून 1925) यांनी म्हटल्याचं चार्ल्स अॅलन आणि शारदा द्विवेदी (Charles Allen and Sharda Dwivedi) यांनी 'लाइव्ह्ज ऑफ दी इंडियन प्रिन्सेस' (Lives of the Indian Princes) या त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.

निष्ठेचं द्योतक - घाम, रक्त आणि कदाचित पादत्राणंही...

18व्या शतकाच्या पूर्वार्धात राणोजीराव यांनी पेशव्यांच्या उत्तरेकडच्या मोहिमांमध्ये बाळाजी बाजीराव पहिले यांना साथ केली. एन. जी. राठोड यांनी 'दी ग्रेट मराठा महादजी शिंदे' या त्यांच्या पुस्तकात राणोजींच्या निष्ठेविषयी लिहिलं आहे. त्या काळी शत्रुपक्षाच्या लोकांच्या पादत्राणांमध्ये विषारी पदार्थ टाकण्याची एक पद्धत अवलंबली जायची. एकदा बाजीराव रात्री उशिरा एका कामगिरीवरून आले आणि त्यांचा खाजगी नोकर असलेल्या राणोजींना शोधत होते. त्या वेळी राणोजी झोपेत असतानाही आपल्या स्वामीची पादत्राणं आपल्या उराशी कवटाळून झोपले होते. ती पादत्राणं चुकीच्या हातात पडणार नाहीत, याची काळजी त्यांनी घेतली. राणोजींची निष्ठा पाहून बाजीरावांनी त्यांना आपल्या अश्वशाळेचा प्रमुख केलं. एक साधा दास या घटनेतून पुढे आला आणि नंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.

सर जॉन माल्कम (1769-1833) (Sir John Malcolm) या स्कॉटिश सैनिकाने मध्य भारतात समन्वयक आणि मुत्सद्दी म्हणून काम केलं होतं. 'ए मेमॉयर ऑफ सेंट्रल इंडिया : इन्क्लुडिंग माळवा अँड अॅडजॉयनिंग प्रॉव्हिन्सेस' (A Memoir of Central India: Including Malwa, and Adjoining  Provinces) हा द्विखंडीय ग्रंथ त्याने लिहिला आहे. माल्कमने त्याच्या या ग्रंथात वरची कथा थोडी वेगळ्या प्रकारे लिहिली आहे. त्याने शिंदे हे आर्थिकदृष्ट्या मागास अशा कुणबी जातीचे (OBC) असल्याचा उल्लेख केला आहे.

शिंद्यांच्या कोर्टात व्हाइसरॉयचा राजकीय प्रतिनिधी असलेल्या कॅप्टन स्टुअर्टने 1819मध्ये सर जॉन माल्कम यांना एक पत्र लिहिलं होतं. त्याच्या आधारे माल्कमने, बाजीरावांची पादत्राणं सांभाळणारा एक नोकर असलेल्या राणोजींचा उत्कर्ष कसा झाला, ते त्याच्या पुस्तकात लिहिलं आहे. एके दिवशी बाजीराव छत्रपती शाहूजी महाराजांबरोबरच्या प्रदीर्घ चर्चेनंतर बाहेर पडले, तेव्हा त्यांना दिसलं, की राणोजी झोपलेले असतानाही त्यांच्या स्वामींची (बाजीरावांची) पादत्राणं जवळ घेऊनच झोपला आहे. ते पाहून बाजीरावांनी त्यांना अंगरक्षक म्हणून बढती दिली.

हे ही वाचा - Explainer: 55 लाख लोकसंख्येचा न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियन कसा बनला?

जेव्हा महादजी माधवराव पेशवे द्वितीय यांच्या पुण्यातल्या दरबारात गेले होते, तेव्हा त्यांनी त्यांचं घराणं उच्च नसल्याबद्दल एक नाट्यमय, परंतु प्रभावी कृती केली होती. महादजी पुण्यातील वाड्याच्या द्वाराबाहेर हत्तीवरून खाली उतरले आणि दरबारातील सरदार आणि इतर मानकऱ्यांपेक्षा खालच्या स्थानावर उभे राहिले. माधवराव पेशवे (द्वितीय) दरबारात आले, तेव्हा त्यांनी महादजींना मानकऱ्यांसोबत बसायला सांगितलं. तेव्हा महादजींनी त्यांच्याकडे असलेलं एक गाठोडं सोडलं. त्यात पहिल्या बाजीरावांची पादत्राणं होती. महादजींनी सांगितलं, की 'हे माझं काम आहे. ही जबाबदारी माझे वडील राणोजींनी सांभाळली होती.'

हे वाचा -  पुण्यात क्लास वन अधिकारी असलेल्या कांशीरामांनी कसं उभारलं बहुजन आंदोलन

हे ऐकल्यावर माधवराव पेशवे सद्गगदित झाले. त्यांनी स्वतः महादजींना उच्च स्थानावर नेऊन बसवल्याचं सांगितलं जातं. जनरल माल्कमच्या मते महादजींनी आपलं घराणं उच्च नसल्याबद्दल अभिमानाने सांगितल्याची ही पहिलीच वेळ नव्हती. 'निःसंशयपणे त्यांचे अन्य काही हेतूही होते. भारतात त्याबद्दल सहज बोललं जातं. महादजींनी स्वतःला पटेल किंवा गावाचा प्रमुख असं संबोधून साम्राज्याचं सार्वभौमत्व घेतलं. ते ज्या समाजात जन्मले, त्या समाजाच्या मूळ चालीरितींना साजेशा त्यांच्या कृती होत्या. त्यांची बुद्धिमत्ता आणि ऊर्जेबद्दल त्यांच्या समाजाला अभिमान होता. ते सर्वांत यशस्वी मराठा सरदारांपैकी एक होते. सत्तेमुळे मिळालेल्या शक्तीवर ते समाधानी होते आणि इतरांना त्यांनी त्यांच्या मार्गावर चालायला भाग पाडलं.'

First published:

Tags: Gwalior, History, Jyotiraditya scindia