बळीराज्याच्या लेकाने रचला इतिहास; जगातील टॉप शास्रज्ञांमध्ये समावेश

एका साधारण शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या सिंह यांनी जगभरातील टॉपच्या वैज्ञानिकांमध्ये स्थान मिळवले आहे.

एका साधारण शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या सिंह यांनी जगभरातील टॉपच्या वैज्ञानिकांमध्ये स्थान मिळवले आहे.

  • Share this:
    पंजाब, 5 नोव्हेंबर : हरियाणामधील समेन गावातील शास्रज्ञ प्रोफेसर बलजीत सिंह यांचा जगातील टॉप वैज्ञानिकांमध्ये समावेश झाला आहे. बलजीत सिंह यांनी अमेरीकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या टॉपच्या वैज्ञानिकांच्या यादीमध्ये स्थान मिळवलं आहे. प्लॉस बायोलॉजी इंटरवेन्शन जर्नलमध्ये ही यादी प्रकाशित झाली असून प्रोफेसर बलजीत सिंह सध्या चंदीगढमधील सेक्टर-11 मधील पोस्ट ग्रॅज्युएट सरकारी कॉलेजमध्ये गणिताचे प्रोफेसर आहेत. तर त्यांचे कुटुंब हरियाणातील हिस्सारमध्ये राहत आहेत. बलजीत सिंह हे हरियाणाच्या हिसारमधील समेन गावातील मूळ रहिवासी आहेत. एका साधारण शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या सिंह यांनी जगभरातील टॉपच्या वैज्ञानिकांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यांचे आतपर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर प्रकाशित झाले असून या रेकॉर्ड लिस्टमध्ये त्यांच्या 107 रिसर्च पेपरचा समावेश आहे. २ वर्षांपासून शिक्षकी पेशात असलेल्या सिंह यांचा 1996 मध्ये पहिला रिसर्च पेपर प्रकाशित झाला होता. उत्तर भारतात एकमेव वैज्ञनिक या कॉलेजच्या यादीमध्ये स्थान मिळवणारे बलजीत सिंह हे संपूर्ण उत्तर भारतातील एकमेव वैज्ञानिक आहेत. या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या यादीत पंजाब विद्यापीठातील 11, चंदीगडमधील पीजीआयच्या 10 वैज्ञानिकांचा समावेश आहे. या यादीत जगभरातील एक लाख 60 हजार वैज्ञानिकांचा आणि भारतातील 7800 वैज्ञानिकांचा समावेश आहे. हे ही वाचा-ऑनलाइन क्लास संपताच पाचवीतील सार्थकने टायने गळफास घेऊन केली आत्महत्या प्रा. बलजित म्हणतात, प्लॉस बायोलॉजी इंटरवेन्शन जर्नलमध्ये जगातील 2 टक्के वैज्ञानिकांच्या यादीत नाव आल्यानंतर त्यांनी हा केवळ माझ्यासाठी गौरव नसून कॉलेजसाठीदेखील मोठा सन्मान आहे. यादीत पंजाब विद्यापीठातील 11, चंदीगडमधील पीजीआयच्या 10 वैज्ञानिकांचा समावेश आहे. कॉलेज स्तरावर हा पुरस्कार प्राप्त मिळणं हा सिंह यांच्यासाठी मोठा सन्मान आहे. मेकॅनिक्स या विषयावर ते रिसर्च करत असून आतापर्यंत पाच संशोधकांना त्यांनी पीएचडी करण्यात मदत केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published: