भारत आज रात्री चंद्रावर रचणार इतिहास, वाचा 'Chandrayaan 2' चा महत्त्वाचा टप्पा

भारत आज रात्री चंद्रावर रचणार इतिहास, वाचा 'Chandrayaan 2' चा महत्त्वाचा टप्पा

चंद्रावर उतरल्यानंतर, रोव्हर प्रज्ञान विक्रमच्या आतून बाहेर येईल आणि सकाळी साडेसहाच्या दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर चालत जाईल. प्रज्ञान रोव्हर 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर राहील आणि चंद्राची छायाचित्रं आणि तिथल्या स्थितीबद्दल शास्त्रज्ञांना माहिती देईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 सप्टेंबर : इस्रो चांद्रयान -2चे लँडर 'विक्रम' शनिवारी पहाटे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणार आहे. हा भारातासाठी ऐतिहासिक दिवस असणार आहे. भारताची ही दुसरी चंद्र मिशन चंद्राच्या त्या दक्षिण ध्रुव क्षेत्रावर प्रकाश टाकेल जिथे आजपर्यंत कोणत्याही देशाने पाय ठेवला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 70 विद्यार्थ्यांसह इस्रोच्या बंगळुरू केंद्रात हे पाहणार आहे. यासह अमेरिकन एजन्सी नासासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेवर आहे. लॅन्डर विक्रममध्ये तीन ते चार कॅमेरे आणि सेन्सर्ससह अशी सर्व तंत्रज्ञान वापरली गेली आहे, ज्यामुळे त्याचं कोणतंही नुकसान होणार नाही.

चंद्रावर उतरल्यानंतर, रोव्हर प्रज्ञान विक्रमच्या आतून बाहेर येईल आणि सकाळी साडेसहाच्या दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर चालत जाईल. प्रज्ञान रोव्हर 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर राहील आणि चंद्राची छायाचित्रं आणि तिथल्या स्थितीबद्दल शास्त्रज्ञांना माहिती देईल.

1:40 मिनिटांपासून 1:55 मिनिटांपर्यंत काय होईल?

7 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज रात्री 1.40 वाजता विक्रमची विद्युत यंत्रणा सक्रिय होईल. विक्रम चंद्राच्या पृष्ठभागाच्या अनुरूप असेल. विक्रम चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे त्याच्या ऑनबोर्ड कॅमेर्‍याने घेण्यास सुरवात करेल. विक्रम चंद्रच्या पृष्ठभागाच्या इतर छायाचित्रांसह त्याच्या छायाचित्रांची जुळवाजुळव करून उतरण्यासाठी योग्य जागा कोणती आहे हे शोधण्याचा प्रयत्न करेल.

इस्रो अभियंत्याने लँडिंगची जागा ठरवली असून त्या ठिकाणी चांद्रयान उतरण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. लँडिंगचा पृष्ठभाग हा 12 अंशांपेक्षा जास्त उंच असू नये. जेणेकरून उतरवण्यात अडथळा येणार नाही. एकदा विक्रम लँडिंगची जागा ओळखल्यानंतर, सॉफ्ट लाँच तयारी केली जाईल. यासाठी सुमारे 15 मिनिटं लागतील. हे 15 मिनिटे चांद्रयान मोहिमेच्या यशाचा इतिहास लिहितील.

इतर बातम्या - Weather Update: मुंबईसह राज्यातील 'या' भागांत 6 ते 8 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टी!

नॅशनल जिओग्राफिकवर होणार थेट प्रक्षेपण

नॅशनल जिओग्राफिकने मंगळवारी जाहीर केलं आहे की, चांद्रयान -2च्या लँडिंगचं विशेष थेट प्रक्षेपण करून आपल्या दर्शकांना जीवनभरचा ऐतिहासिक अनुभव देणार आहोत. 6 सप्टेंबर, 2019 रोजी रात्री 11:30 वाजेपासून हा कार्यक्रम नॅशनल जिओग्राफिक चॅनल आणि हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. हॉटस्टार वापरकर्ते हे लाईव्ह पाहू शकतात.

इतर बातम्या - बाप्पाची आरती ठरली अखेरची, 10 वर्षाच्या चिमुकल्याला...

असा इतिहास रचनारा भारत हा जगातला पहिला देश

जर इस्रो एखाद्या 'सॉफ्ट लँडिंग'मध्ये यशस्वी झाला तर रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत असं करणारा जगातील चौथा आणि चंद्रातील दक्षिण ध्रुव प्रदेशात पोहोचणारा जगातील पहिला देश बनेल. अंतराळ एजन्सीने म्हटले आहे की 'चांद्रयान -2' 70  डिग्री दक्षिणेला अक्षांश असलेल्या मांझिनस सी आणि 'सिम्पेलियस एन' या दोन खड्ड्यांमधील उंच मैदानात लँडर आणि रोव्हर उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे.

इतर बातम्या - उद्धव ठाकरेंच्या 'या' सूचक वक्तव्यामुळे पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच?

चांद्रयान -2चं ऑर्बिटर एक वर्ष चंद्रावर राहू शकेल

चांद्रयान -2 च्या ऑर्बिटरचं आयुष्य एक वर्षाचे आहे. यावेळी, ते चंद्राची परिक्रमा सुरू ठेवेल आणि पृथ्वीवरील इस्रोच्या शास्त्रज्ञांना सर्व माहिती पाठवत राहिल. त्याच वेळी, 'प्रज्ञान' रोव्हरचे जीवन एका चंद्राच्या दिवसाइतकेच आहे म्हणजेच पृथ्वीच्या 14 दिवसांसारखे आहे. या दरम्यान, तो वैज्ञानिक प्रयोग करून आपली माहिती इस्रोला पाठवेल.

SPECIAL REPORT : पाकड्यांचा भारताविरोधात नवा कट?

Published by: Renuka Dhaybar
First published: September 6, 2019, 9:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading