मराठी बातम्या /बातम्या /देश /

ऐतिहासिक! बलात्कारप्रकरणी कोर्टाने दिला फक्त 5 दिवसांत निकाल; गुन्हेगाराला 20 वर्षं कारावास

ऐतिहासिक! बलात्कारप्रकरणी कोर्टाने दिला फक्त 5 दिवसांत निकाल; गुन्हेगाराला 20 वर्षं कारावास

 बलात्काराच्या प्रकरणात (Rape Case) गुन्हेगाराला अवघ्या 9 दिवसांत शिक्षा सुनावत एक आदर्श निर्माण केला आहे.

बलात्काराच्या प्रकरणात (Rape Case) गुन्हेगाराला अवघ्या 9 दिवसांत शिक्षा सुनावत एक आदर्श निर्माण केला आहे.

बलात्काराच्या प्रकरणात (Rape Case) गुन्हेगाराला अवघ्या 9 दिवसांत शिक्षा सुनावत एक आदर्श निर्माण केला आहे.

जयपूर, 7 ऑक्टोबर: देशात बलात्कार झालेल्या पीडितेला न्यायासाठी दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागते. पुरावे जमा करणं, सु नावण्या यात बराच कालावधी जातो. घटनेनंतर अनेकदा द्रुतगती न्यायलयात या प्रकरणाचा खटला चालवा अशीदेखील मागणी केली जाते. पीडितेला लवकर न्याय मिळावा आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळावी, अशी त्यामागची भूमिका असते. याच पार्श्वभूमीवर जयपूर न्यायालयाने (Jaipur Court) अपहरण आणि बलात्काराच्या प्रकरणात (Rape Case) गुन्हेगाराला अवघ्या 9 दिवसांत शिक्षा सुनावत एक आदर्श निर्माण केला आहे. याबाबतचं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने दिलं आहे.

जयपूरमधल्या कोटाखावदा भागातली 9 वर्षांची मुलगी 26 सप्टेंबरला सायंकाळी 6.30 वाजता आजोबांसाठी विडी आणायला घराबाहेर पडली. या दरम्यान त्याच गावातल्या 25 वर्षांच्या कमलेश मीणा या व्यक्तीने या मुलीला आमिष दाखवून घरापासून दूर निर्मनुष्य ठिकाणी नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनेदरम्यान ही मुलगी रडू लागताच त्याने तिचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ही मुलगी बेशुद्ध पडली. मुलीचा मृत्यू झाला असं समजून आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. शुद्धीवर आल्यावर ही मुलगी घरी गेली असता तिच्या कपड्यावरचे रक्ताचे डाग पाहून तिची आई घाबरली. या मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तेथून तिला कोटखावदा इथल्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्याचा सल्ला देण्यात आला. रात्री 10.30 वाजता या घटनेची माहिती पोलिसांना (Police) मिळाली; मात्र मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला जयपूरमधल्या जयपुरीया रुग्णालयात हलवण्यात आलं.

मित्राची मजा अन् नवरदेवाला सजा, वरातीत बँड वाजला; नेमकं काय झालं पाहा VIDEO

अतिरिक्त डीसीपी अवनीश कुमार शर्मा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले, की `150 पोलिस कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथकं आरोपीच्या शोधार्थ पाठवण्यात आली. सलग 18 तास पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. तपास, आरोपीला अटक ते शिक्षेची सुनावणी होईपर्यंत पोलिसांची ही पथकं अविरत काम करत होती. पोलिसांनी आरोपीला 13 तासांत अटक केली. त्यानंतर 6 तासांत आरोपीविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्रदेखील दाखल केलं. पीडित मुलगी अजूनही जयपूर रुग्णालयात दाखल असून, न्यायालयात आणण्यासारखी तिची स्थिती नव्हती. त्यामुळे न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या (Video Conference) माध्यमातून पीडित मुलीचा जबाब नोंदवला. त्यानंतर 5 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता न्यायाधीशांनी आरोपीला 20 वर्षं कारावास आणि 2 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

VIDEO :शाळेच्या खोलीत तरुणीसोबत शिक्षकाचा घृणास्पद प्रकार, गावकऱ्यांनी पकडलं

कदाचित हे देशातलं पहिलंच प्रकरण असेल, की ज्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला केवळ चार दिवसांच्या सुनावणीनंतर पाचव्या दिवशी शिक्षा सुनावली गेली. 4 दिवसांत 28 तासांच्या सुनावणीनंतर (Hearing) जयपूर न्यायालयाने आपला ऐतिहासिक निकाल दिला. पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यात जयपूर पोलिस कमिश्नरेटच्या दक्षिण जिल्ह्यातले 150 पोलिस कर्मचारी, पॉक्सो न्यायालय, विशेष सरकारी वकील, एफएसएल पथक, डॉक्टर्स आणि तपास यंत्रणांनी विशेष भूमिका बजावली.

First published:

Tags: Court, Jaipur, Rape, Rape case