Home /News /national /

आंतरराष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजित बच्चन यांची हत्या, मॉर्निंग वॉकला गेले असता झाडल्या गोळ्या

आंतरराष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजित बच्चन यांची हत्या, मॉर्निंग वॉकला गेले असता झाडल्या गोळ्या

रणजित बच्चन हजरतगंजच्या ओसीआर इमारतीत राहत होते. रणजित बच्चन मूळचे गोरखपूरचे होते.

    लखनऊ, 02 फेब्रुवारी : रविवारी सकाळी आंतरराष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजित बच्चन (Ranjeet Bachchan) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रणजित बच्चन मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यावेळी दुचाकीस्वाराने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. सध्या घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. तर हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. रणजित बच्चन हजरतगंजच्या ओसीआर इमारतीत राहत होते. रणजित बच्चन मूळचे गोरखपूरचे होते. ते समाजवादी पक्षाचे सांस्कृतिक कार्यक्रमही करायचे. दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांनी त्यांना डोक्यात गोळी घालून ठार केले. राजधानी लखनऊमधील हजरतगंज (Hazratganj) भागात हा सगळा प्रकार घडला आहे. इतर बातम्या - शेम ऑन यू पाकिस्तान गव्हर्नमेंट, भारताकडून काहीतरी शिका; पाक विद्यार्थ्याचा रोष मॉर्निंग वॉकला गेले असता झाली हत्या ही घटना सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. रणजित बच्चन त्यांच्या मित्र आशिष श्रीवास्तवसोबत मॉर्निंग वॉकला गेले होते. जेव्हा ते ग्लोब पार्कपासून पुढे निघत होते तेव्हा काही दुचाकीस्वार आले आणि त्यांनी थेट बच्चन यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. या घटनेमध्ये आशिष श्रीवास्तवदेखील जखमी झाले ज्यांच्यावर ट्रामा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचे अद्याप कोणतेही कारण समोर आले नसून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे. यावेळी पोलीस आयुक्तांसह उच्च अधिकारी उपस्थित होते. गेल्या वर्षी हिंदुवादी नेते कमलेश तिवारी यांनाही त्यांच्याच घरात घुसून ठार मारण्यात आले होते. त्यामुळे रणजित बच्चन यांच्या हत्येबाबत आता बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. इतर बातम्या - शाहीन बाग गोळीबार: युवकाने सांगितलं गोळीबार करण्याचं कारण, पोलिसही हैराण
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या