कुमारस्वामी यांच्या शपथविधीला हिंदु महासभेचा विरोध, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

कुमारस्वामी यांच्या शपथविधीला हिंदु महासभेचा विरोध, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

कर्नाटक राज्यात उद्या नवीन सरकार स्थापन होत असतानाच अजूनही राजकीय घडामोडी सुरूच आहेत. कुमार स्वामी यांच्या शपथविधीला हिंदु महासभेने विरोध केला असून याबाबत हिंदू महासभेने सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आहे.

  • Share this:

कर्नाटक, 22 मे : कर्नाटक राज्यात उद्या नवीन सरकार स्थापन होत असतानाच अजूनही राजकीय घडामोडी सुरूच आहेत. कुमार स्वामी यांच्या शपथविधीला हिंदु महासभेने विरोध केला असून याबाबत हिंदू महासभेने सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आहे. कुमार स्वामी यांचा शपथविधी घटनाबाह्य असून असल्याचं या याचिकेमध्ये हिंदुमहासभेने म्हटल आहे तर दुसरीकडे कुमारस्वामी यांचा शपथविधी उद्या दुपारी साडेबारा किंवा संध्याकाळी चार वाजता होणार असल्याची माहिती आहे.

तर नव्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होणार असून ही दोन्ही पदे काँग्रेसला देण्याची सूचना राहुल गांधी यांनी कुमार स्वामी यांना केल्याचे समजते आहे. तसंच काँग्रेसचे आमदार आणि येडियुरप्पा यांच्या विरोधात दंड थोपटणारे डी के शिवकुमार यांनाही महत्त्वाचं मंत्रीपद देण्यात येणार आहे तर दुसरीकडे काल वीरशैव महासभेनेही कुमारस्वामी यांना एक पत्र लिहिले असून राज्याचे गृहमंत्रीपद वीरशैव समाजातील आमदारांकडे द्यावा अशीही मागणी केली आहे.

त्यामुळे शपथविधीला अवघे काही तास उरले असताना अजूनही काँग्रेस आणि जेडीएस सरकार समोरच्या अडचणी काही संपता संपत नाहीत असंच चित्र सध्या तरी कर्नाटक राज्यात दिसतय. तर तिकडे डी. बी. देवेगौडा यांच्या आग्रहाच्या निमंत्रणावरून शरदराव पवार कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभास उपस्थित रहाणार असल्याची माहिती मिळतेय.

First published: May 22, 2018, 11:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading