गोडसेच्या फाशीला 70 वर्षे, हिंदू महासभेनं आरतीनंतर केली धक्कादायक मागणी

गोडसेच्या फाशीला 70 वर्षे, हिंदू महासभेनं आरतीनंतर केली धक्कादायक मागणी

दोन वर्षांपूर्वी हिंदू महासभेच्या वतीनं नथुराम गोडसेचं मंदिर उभारून तिथं फोटोही पुजला होता. त्यानंतर आता पुन्हा आरती केल्यानंतर धक्कादायक मागणी करण्यात आली आहे.

  • Share this:

ग्वाल्हेर, 15 नोव्हेंबर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये पुन्हा एकदा नथुराम गोडसेची पूजा आणि आरती करण्यात आली. एवढंच नाही तर याही पुढे जाऊन त्याची शेवटची वाक्ये शाळा आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमाती समाविष्ट करावीत अशी धक्कादायक मागणीही केली गेली. नथुराम गोडसेला फाशी दिल्याच्या घटनेला आज 70 वर्षे पूर्ण झाली यानिमित्त दौलत गंज इथल्या हिंदू महासभेच्या कार्यालयात 70 वा बलिदान दिवस साजरा केला गेला.

हिंदू महासभेच्या या कार्यालयात नथुराम गोडसेच्या फोटोची पूजा करण्यात आली. तसंच त्याचे गुणगाण करणारी आरतीही केली गेली. आरती झाल्यानंतर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांच्यावतीने प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या नावे एक निवेदन देण्यात आलं. त्यामध्ये हिंजू महासभेनं नथुराम गोडसेने न्यायालयात शेवटी दिलेल्या साक्षीला शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावं अशी मागणी केली आहे.

दोन वर्षांपूर्वी 2017 मध्ये हिंदू महासभेनं गोडसेचं मंदिर उभारलं होतं. त्यामध्ये त्याचा फोटोही लावला होता. तेव्हा काँग्रेसच्या तक्रारीनंतर आणि विरोधानंतर पोलिसांनी फोटो ताब्यात घेतला होता. तो फोट परत मिळावा अशी मागणीही यावेळी केली गेली.

VIDEO : सेनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष्य, आशिष शेलारांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2019 01:52 PM IST

ताज्या बातम्या