माणुसकीच खरा धर्म! लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मुस्लिम युवकासाठी हिंदू कुटुंब करतय इफ्तारी

माणुसकीच खरा धर्म! लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मुस्लिम युवकासाठी हिंदू कुटुंब करतय इफ्तारी

देशातील काही भागांमध्ये धर्माचे राजकारण केले जात आहे. मात्र अशाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोनं भारताची विविधतेतील एकता स्पष्ट दिसत आहे.

  • Share this:

आसाम, 28 एप्रिल : भारतात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं या लढ्यात सर्व भारतीयांनी एकत्र राहण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीतही देशातील काही भागांमध्ये धर्माचे राजकारण केले जात आहे. मात्र अशाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोनं भारताची विविधतेतील एकता स्पष्ट दिसत आहे. हा फोटोमध्ये आसामधील एक कुटुंबाचा. या हिंदू कुटुंबानं घरापासून दूर अडकलेल्या मुस्लिम मुलासाठी इफ्तारीचे आयोजन केले.

देशात 25 मार्च लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं मजूरांपासून ते विद्यार्थ्यांपासून हजारो लोकं घरापासून दूर अडकले आहेत. असाच एक मुस्लीम तरुण आसामच्या माजुली येथेही आहे. दरम्यान, शनिवारपासून पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजानला सुरुवात झाली. हा मुस्लिम तरुण रमजानमध्येही उपवास करीत आहे. सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे एक हिंदू कुटुंब या युवकासाठी इफ्तार (संध्याकाळी उपवास उघडणे) व्यवस्था करीत आहेत.

वाचा-रमजान - डायबेटिज रुग्णांनो रोजा ठेवताना 'या' गोष्टी जरूर लक्षात ठेवा

वाचा-खूशखबर! भारत 'या' तारखेपर्यंत मिळवणार कोरोनावर विजय, संशोधकांचा सर्वात मोठा दावा

एवढेच नाही तर हे कुटुंब या मुलासोबत एकत्र बसून या इफ्तारीचा आनंद घेत आहे. ऑल इंडिया रेडिओ न्यूजनं हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये एक महिला आणि पुरुष यांच्यामध्ये एक मुलगा बसलेला दिसत आहे. त्यांच्यासमोर खाण्याचे पदार्थ ठेवलेले दिसत आहेत. तिघंही एकत्र चहा पिताना दिसत आहेत. हा फोटो व्हायरल होत असून या हिंदू कुटुंबाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

First published: April 28, 2020, 11:38 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading