मराठी बातम्या /बातम्या /देश /

हिंदूंनी प्रसंगावधान राखून विझवली ताजियाला लागलेली आग; कन्हैयालालच्या दुकानाजवळ घडली घटना

हिंदूंनी प्रसंगावधान राखून विझवली ताजियाला लागलेली आग; कन्हैयालालच्या दुकानाजवळ घडली घटना

मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ताजियाला अचानक आग लागली; मात्र प्रसंगावधान राखून एका हिंदू कुटुंबाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ताजियाला अचानक आग लागली; मात्र प्रसंगावधान राखून एका हिंदू कुटुंबाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ताजियाला अचानक आग लागली; मात्र प्रसंगावधान राखून एका हिंदू कुटुंबाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

मुंबई, 11 ऑगस्ट:  गेल्या काही महिन्यांपासून देशातल्या काही भागांमध्ये विविध कारणांवरून धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे. राजस्थानमधला टेलर कन्हैयालाल याची इस्लामचा अपमान केल्याच्या कारणावरून दोघांनी हत्या केली होती. त्यामुळे बराच काळ त्या भागात अशांतता होती; मात्र त्याच उदयपूरमध्ये नुकतंच धार्मिक सलोख्याचं एक चांगलं उदाहरण पाहायला मिळालं. मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ताजियाला अचानक आग लागली; मात्र प्रसंगावधान राखून एका हिंदू कुटुंबाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. एनडीटीव्हीने याविषयीचं वृत्त दिलं आहे. मोहरमच्या मिरवणुकीत एका ताजियाला अचानक आग लागली; मात्र एक हिंदू कुटुंब प्रसंगावधान राखून मदतीसाठी धावून आलं. ही घटना राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालालच्या दुकानापासून अवघ्या काही मीटर अंतरावर घडली. मंगळवारी (9 ऑगस्ट) सायंकाळी मोचीवाडा रस्त्यावरच्याअरुंद गल्लीतून मोहरमनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक मार्गस्थ होत असताना 25 फूट उंच ताजियाच्या कळसाला आग लागली. ताजियाच्या पाठीमागे असलेल्या मुस्लिम बांधवांना ही आग लागल्याचं लक्षात आलं नाही; मात्र या ठिकाणी असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून मिरवणूक पाहणाऱ्या स्थानिक व्यक्तींना आग लागल्याचं निदर्शनास आलं. आग लागल्याचं लक्षात येताच स्थानिकांनी वेळ न दवडता आग विझवण्यास सुरुवात केली. हेही वाचा - rakshabandhan दिवशी बहिणींवर संकट, राखी बांधायला जाणाऱ्या महिलांची बोट बुडाली, 50 बेपत्ता वरिष्ठ पोलीस अधिकारी शिप्रा राजावत यांनी सांगितलं की, 'मी घटनास्थळी उपस्थित होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे किंवा अगरबत्तीमुळे लागली असावी. हिंदूंनी ही आग विझवल्यानंतर मुस्लिमांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले.' 'आशिष चौवडिया, राजकुमार सोळंकी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आग विझवण्यासाठी त्यांच्या बाल्कनीतून पाणी ओतलं. आग पूर्णतः विझेपर्यंत ते पाणी ओतत राहिले', अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 'यामुळे मोठी दुर्घटना टळलीच; पण धार्मिक सलोख्याचंही ते उदाहरण ठरलं. या घटनेनं सर्वांची मनं जिंकली', असं जिल्हाधिकारी ताराचंद मीना यांनी सांगितलं. 28 जून रोजी मालदास रोडवर द्वेषातून कन्हैयालालची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. रियाझ अख्तारी ऊर्फ रियाझ अत्तारी आणि घौस मोहम्मद या दोघांनी ती केली होती. हत्येनंतर या दोघांनी एक व्हिडिओ जारी केला होता. इस्लामचा अपमान केल्याबद्दल बदला घेण्यासाठी त्याचा शिरच्छेद करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या मालदास रोडपासून जवळच ही घटना घडली.
First published:

Tags: Fire, Videos viral

पुढील बातम्या