डेहराडून, 25 सप्टेंबर : भारतामध्ये विविध धर्मांचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात. वेगवेगळ्या जाती, धर्म, पंताचे लोक एकमेकांना मदतीसाठी जाती, धर्माच्या भिंती मधे आणत नाहीत. अशीच एक भारताची विविधतेतील एकता दाखवून देणारी एक घटना समोर आली आहे. हिंदू, मुस्लीम कुटुंबांनी बंधुत्वाचा अनोखा आदर्श ठेवला आहे.
उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यातील कोटद्वार भागातील डोईवाला येथील हिंदू आणि मुस्लीम कुटुंबांनी एकमेकांची अशा प्रकारे मदत केली, ज्याचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे. येथील हिमालयन हॉस्पिटल, जोलीग्रंट, डोईवालाच्या नेफ्रोलॉजी विभागात हिंदू-मुस्लीम कुटुंबांतील महिलांनी पतीचा जीव वाचवण्यासाठी एकमेकींच्या पतींना किडनी दान (
women donate kidneys) केली आहे. डोईवाला भागातील तेलीवाला येथील रहिवासी अशरफ अली आणि कोटद्वार येथील रहिवासी विकास युनियाल यांना किडनीच्या समस्येमुळे हिमालयीन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोघेही मूत्रपिंड (किडनी) दाता शोधत होते मात्र त्यांना तशी कोण व्यक्ती सापडत नव्हती.
दोन्ही कुटुंबात आनंदी वातावरण
अशा स्थितीत प्रथम अशरफ अली यांची पत्नी सुल्तानाने तिची किडनी (
kidneys) कोटद्वार निवासी विकास उनियाल यांना दान केली. नंतर विकास उनियाल यांची पत्नी सुषमा यांनी त्यांची किडनी अशरफ अली यांना दान केली. किडनी प्रत्यारोपणानंतर दोघेही निरोगी आहेत, त्यामुळं आता दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रक्तगट जुळत नव्हता... पण
51 वर्षीय अशरफ अली यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्यानंतर ते दोन वर्षे हेमो डायलिसिसवर होते. त्यांची पत्नी सुल्ताना खातून त्यांची एक किडनी त्यांना द्यायला तयार झाल्या होत्या, पण त्यांचा रक्तगट अली यांच्या पीटीआयशी जुळत नसल्याने त्या नाराज झाल्या होत्या.
हे वाचा -
रातोरात बदललं नशीब; महिलेला मोफत मिळालं लॉटरी तिकीट; पुढे जे घडलं ते जाणून व्हाल थक्क
डॉक्टरांनी दोन्ही कुटुंबांना आणलं एकत्र
कोटद्वार येथील रहिवासी 50 वर्षीय विकास उनियाल यांनाही हीच समस्या होती. तेही दोन वर्षे हेमो डायलिसिसवर होते. अशा स्थितीत हिमालयन हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल नेफ्रोलॉजिस्ट डॉ.शादाब अहमद यांनी दोन्ही कुटुंबांना एक कल्पना सुचवली ज्याने ही दोन भिन्न धर्मीय कुटुंबे जणू एकत्र आली.
हे वाचा -
जगासमोर इम्रान खान यांची नाचक्की! काश्मीरचा मुद्दा राहिला बाजुलाच; UNGA साठी गेलेल्या पाकिस्तानी प्रतिनिधीनं उधळली मुक्ताफळं
रक्तगट जुळला आणि मग प्रत्यारोपण
दोघींचा रक्तगट एकमेकींच्या पतीशी जुळल्याने सर्वांनाच हायसे वाटले. रक्तगट जुळल्यानं शेवटी दोघी किडनी दान करण्यावर सहमत झाल्या. सुषमाचा रक्तगट अशरफ आणि सुलतानाचा गट विकासशी जुळला. त्यामुळं सुषमा आणि सुलताना दोघींनी एकमेकांच्या पतीवर किडनी प्रत्यारोपण उपचार केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.