मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारतात दाखल होताच अफगाण नागरिक अश्रू अनावर, भावूक होत म्हणाले...आम्हाला मदत केल्याबद्दल भारताचे आभार

भारतात दाखल होताच अफगाण नागरिक अश्रू अनावर, भावूक होत म्हणाले...आम्हाला मदत केल्याबद्दल भारताचे आभार

Evacuated from Afghanistan: भारतीय भूमीवर उतरल्यानंतर हे नागरिक भावूक झालेत.  त्यांना यावेळी अश्रू अनावर झालेत.

  • Published by:  Pooja Vichare

गाझियाबाद, 22 ऑगस्ट: तालिबान्यांनी (Taliban) काबूलमध्ये (Kabul)कब्जा घेतल्यानंतर अफगाणिस्तानातून भारतीयांची घरवापसी सुरु आहे. रविवारी भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force)विमान एकूण 168 नागरिकांना घेऊन गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचले. यापैकी 107 हे भारतीय नागरिक आहेत. भारतीय भूमीवर उतरल्यानंतर हे नागरिक भावूक झालेत. त्यांना यावेळी अश्रू अनावर झालेत. त्यांनी कॅमेऱ्यासमोर त्यांच्या कहाण्या सांगितल्या. सध्या या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी (RT-PCR) एअरबेसवर केली जात आहे.

अफगाणिस्तानातून भारतात आलेले नरेंद्र सिंह खालसा यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी दुःख व्यक्त करताना ते भावनिक झालेत. ते म्हणाले, मला रडायला येत आहे. जे 20 वर्षात तयार केले होते. ते आता संपले आहे. सर्व काही शून्य झाले आहे. खालसा हे अफगाणिस्तानचे संसद सदस्य होते. अलीकडेच अशी बातमी आली की तालिबानने अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदू समाजाला सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.

हिंडन एअरबेसवर दाखल झालेल्या एक अफगान महिलेनं सांगितलं की, तालिबाननं माझं घर जाळलं. अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यासाठी मी माझ्या मुलीसोबत आणि दोन नातवंडांसह येथे आली आहे. आपले भारतीय बंधू आणि भगिनी आम्हाला वाचवण्यासाठी पुढे आले. आम्हाला मदत केल्याबद्दल मी भारताचे आभार मानते.

भारता व्यतिरिक्त ब्रिटन, अमेरिकेसह अनेक देश सतत अफगाण नागरिकांना बाहेर काढण्यात गुंतलेले आहेत.

First published:

Tags: Afghanistan, Kabul