हिमालयात वितळणाऱ्या बर्फामुळे अरबी समुद्राला 'असा' धोका, NASA ने शेअर केले सॅटेलाइट PHOTO

हिमालयात वितळणाऱ्या बर्फामुळे अरबी समुद्राला 'असा' धोका, NASA ने शेअर केले सॅटेलाइट PHOTO

हिमालयातील वितळणाऱा बर्फ आणि हिमनद्या यामुळे अरबी समुद्रातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 मे : जगात तापमान वाढीचा मुद्दा बऱ्याच वर्षांपासून चर्चेत आहे. तापमानवाढीमुळे अनेक बर्फाळ प्रदेशातील बर्फ आणि हिमनद्यांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. दरम्यान, आता हिमालयातील वितळणाऱा बर्फ आणि हिमनद्या यामुळे अरबी समुद्रातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. समुद्रातील अन्नसाखळी नष्ट होऊ शकेल. वितळणाऱ्या बर्फामुळे आणि हिमनद्यांमुळे समुद्रातील ऑक्सिजन आणि सागरी जीवांचे अन्न तयार होण्याची प्रक्रिया बिघडेल.

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून काढलेला एक फोटो शेअर केला आहे. यात अरबी समुद्रात वाढत असलेलं हिरवंगार शेवाळ दिसत आहेत. अरबी समुद्रात वेगानं शेवाळ वाढत असल्याचं दिसतं. हे शेवाळ समुद्रातील अन्नसाखळीसाठी धोकादायक आहे.

समुद्रात शेवाळाचे नाव नॉक्टिल्यूका सिनिलॅन्स असं आहे. एक मिलिमिटर आकाराच्या या शेवाळास सी स्पार्कल्स असंही म्हणतात. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर याचं प्रमाण जास्त आहे. भारत, पाकिस्तान, ओमान, इराणसह इतर देशांच्या किनारपट्टीलगत पसरत आहेत. नॉक्टिल्यूका सिनिलॅन्स अरबी समुद्रातील अन्नसाखळीचा नाश करत आहे. समुद्रातील प्लँकोटेन्स यामुळं नष्ट होत आहे. प्लँकोटेन्स संपल्यानं समुद्रात ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. याचा परिणाम सागरी जीवांवर होणार आहे.

हे वाचा : रशियन महिलेसोबत लग्नासाठी तरुणाने गाठलं शिमला, सप्तपदीच्या आधीच सापडले पोलिसांना

अरबी समुद्रात Noctiluca sinillains च्या वाढत्या प्रमाणामुळे सागरी जीवांचे अस्तित्व धोक्यात येईल. याचा परिणाम अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या  लोकांच्या जीवनावर होईल. कारण हे सर्व लोक समुद्रातून मिळणाऱ्या सागरी प्राण्यांच्या आणि माशांच्या व्यापारातून उदरनिर्वाह करतात. शेवाळ वाढल्यास मासे मरतील आणि लोकांच्या व्यवसायावर परिणाम होईल. नॉक्टिल्यूका सिनिलॅन्स समुद्राच्या पाण्यावर तरंगतात. त्यामुळे सुर्यप्रकाश पाण्यात पोहोचू शकत नाही. परिणामी प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होईल.

हे वाचा : देशात मीठाचा पुरवठा कमी होणार? लॉकडाऊनमुळे उत्पादन घटलं

हिमालायच्या वितळणाऱ्या बर्फामुळे मान्सूनच्या हंगामात वाहणाऱ्या गरम आणि दमट हवा समुद्राच्या पाण्याच्या वरच्या थराला नुकसान पोहोचवते. यामुळे फायटोप्लँकटॉन तयार होत नाही. तसंच पाण्यातील पोषक द्रव्येही कमी होतात. असे झाल्यानं समुद्री जीवांचे अन्न तयार होण्यात अडचणी येतात आणि ते जीव धोक्यात येतात.

समुद्रात नॉक्टिल्यूका सिनिलँन्सची संख्या वेगाने वाढत आहे. भारत, पाकिस्तान, ओमान, येमेन, सोमालियाचे किनारे निळ्या ते हिरव्या रंगात दिसत आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक देश डिसेलिनेशन प्लांट्सही उभा करत आहेत.

हे वाचा : 'अपना टाइम आयेगा' लिहिलेला टी शर्ट घालून घराबाहेर पडला, पोलिसांना दिसताच...

First published: May 7, 2020, 9:22 PM IST

ताज्या बातम्या