सध्या प्रेम प्रकरण म्हटलं की काही बोलायलाच नको. तसा एक प्रकार हिमाचल प्रदेशमध्ये झाला आहे. एका मुलासाठी दोन मुलींमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. एकमेकींना मारण्यापासून ते केस ओढपर्यंत या दोघींनी मारामारी केली. हा व्हिडिओ हिमाचलच्या हमीरपूर जिल्ह्यातला आहे. बडसर कॉलेजमध्ये हा सगळा प्रकार घडला. व्हिडिओमध्ये एक तरुणी दुसऱ्या तरुणीला दम देत होती. 'मी तुला सांगितलं होतं त्याला ब्लॉक कर, पण तू तसं नाही केलं नाहीस', असं म्हणत या दोघी भांडत होत्या.