Home /News /national /

सियाचीनमध्ये जवान हुतात्मा; गर्भवती पत्नीने व्हिडिओ कॉलच्या मार्फत घेतले अंत्यदर्शन!

सियाचीनमध्ये जवान हुतात्मा; गर्भवती पत्नीने व्हिडिओ कॉलच्या मार्फत घेतले अंत्यदर्शन!

सियाचीन बॉर्डरवर तैनात असलेल्या जवानाचा बर्फाच्या दरीत पडून मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे गर्भवती पत्नीला आपल्या हुतात्मा पतीचे प्रत्यक्ष अंत्यदर्शन घेता आले नाही.

    सोलन, 9 डिसेंबर :  भारतीय जवान वर्षाचे बाराही महिने प्रचंड प्रतिकुल परिस्थितीमध्ये सियाचीनच्या बर्फाळ प्रदेशात (Siachen Border) देशाच्या सीमेचं संरक्षण करतात. सियाचीनमधील सतत बदलणाऱ्या हवामानामुळे अनेक जवान हुतात्मा (Martyred) झाले आहेत. सियाचीन बॉर्डरवर आपल्या चौकीचं संरक्षण करणारा एक जवान पाय घसरुन बर्फाच्या दरीत कोसळल्याने हुतात्मा झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या जवानाच्या गर्भवती पत्नीला त्यांचे प्रत्यक्ष अंत्यदर्शन घेता आले नाही. हिमाचल प्रदेशातील सोलन (Solan) जिल्ह्यातील जवानाच्या कुटुंबावर हा दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे. सोलन जिल्ह्यातले बिजलंग गुरुंग हे जवान सियाचीनच्या बॉर्डवर तैनात होते. चौकीवर पहारा देत असताना ते अचानक बर्फाच्या दरीत कोसळले. त्यांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणात शोधकार्य राबवण्यात आलं, मात्र गुरुंग त्यांना वाचवण्यात शोधपथक अपयशी ठरलं. बर्फाच्या ढिगाऱ्याखालून गुरुंग यांना बाहेर काढण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. (हे वाचा-अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये चीनचा डाव उघड, या 2 कारणांसाठी भारतासोबत केला तणाव) व्हिडिओ कॉलने अंत्यदर्शन गुरुंग यांच्या पत्नी दीपा या आठ महिन्यांच्या गर्भवती असून त्या सध्या कुटुंबीयांसोबत नेपाळमध्ये आहेत. मंगळवारी गुरुंग यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपल्या पतीचं व्हिडिओ कॉलच्या मार्फत अंत्यदर्शन घेतलं. गुरुंग दोन महिन्यांपूर्वी सुट्टी घेऊन त्यांच्या पत्नीला भेटायला नेपाळमध्ये गेले होते. त्या पती-पत्नींची ती शेवटची भेट ठरली. (हे वाचा-चीनमधील लेखिकेवर देशद्रोहाचा आरोप; लॉकडाऊनदरम्यान अनुभव शेअर केले म्हणून...) गुरुंग यांच्या घरात देशसेवेची परंपरा हुतात्मा जवान बिजलंग गुरुंग यांच्या घरात देशसेवेची मोठी परंपरा आहे. त्यांचे वडील गुरुंगयांच्याच  युनिटमधून निवृत्त झाले असून आता डीएसआयच्या मार्फत देशसेवा करत आहेत. तर त्यांचे भाऊ जम्मूच्या सीमेवर तैनात आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Indian army

    पुढील बातम्या