हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी दुपारी 2 पर्यंत 54 टक्के मतदान

हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी  दुपारी 2 पर्यंत 54 टक्के मतदान

हिमाचल प्रदेश विधानसभेत एकूण 68 जागा आहेत. या सर्वच जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. भाजप - कॉंग्रेस या निवडणुकीत आमनेसामने आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. 337 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

  • Share this:

09 नोव्हेंबर: आज हिमाचल प्रदेशमध्ये 68 जागांसाठी मतदान सुरू आहे. या निवडणूकीचा निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे. यात दुपारी 2पर्यंत 54.09 टक्के मतदान झालं आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभेत एकूण 68 जागा आहेत. या सर्वच जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होतं आहे.

भाजप - कॉंग्रेस या निवडणुकीत आमनेसामने आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. 337 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 62 सद्य आमदारही निवडणूक रिंगणात आहेत. वीरभ्रद्र सिंग आपला करिष्मा कायम राखणार की भाजप कॉँग्रेसला वेसण घालण्यात यशस्वी होणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे. 7 हजार 525 मतदान केंद्रांवर मतदान होतं आहे. हिमाचलमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. 17 हजार 850 पोलिंसांसाह होमगार्ड आणि निमलष्करी दलाच्याही तुकड्या तैनात आहेत.

हिमाचलमध्ये आजपर्यंत एकही पक्ष सलग दोनदा सत्तेत आला नाही. त्यामुळे यावेळी तरी काँग्रेस आपली सत्ता टिकवते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2017 08:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...