खोलीत एकटी भेट, तरच मदत करणार; अधिकाऱ्याची महिला सरपंचाला ऑफर

अशाच प्रकारची ऑफर त्याने इतरही काही महिलांना दिल्याचं कळाल्याने रिंकू यांनी शेवटी पोलिसांमध्ये तक्रार केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 09:58 PM IST

खोलीत एकटी भेट, तरच मदत करणार; अधिकाऱ्याची महिला सरपंचाला ऑफर

सिमला 22 ऑगस्ट : गावपातळीवर काम करणाऱ्या महिला सरपंचांना अनेक पातळ्यांवर लढावं लागतं. कुटुंब सांभाळून कावाचा कारभार करणाऱ्या या महिलांना सरकारी अधिकारी कुठल्या पद्धतीने त्रास देतात याची धक्कादायक घटना हिमाचल प्रदेशात उघड झालीय. बेटी बचाव, बेटी पढाव या अभियानात सहभागी असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्यानेच एका महिला सरपंचाला खोलीत एकटं भेटायला बोलावल्याने खळबळ उडालीय. या महिला सरपंचाने घटनेची पोलिसांमध्ये तक्रार केली असून कारवाईची मागणी केलीय.

हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यातल्या सुलपूर या गावातली ही घटना आहे. सुलपूरच्या सरपंच रिंकू चंदेल यांनी या घटनेचा खुलासा केलाय. गावात बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान राबवत असताना त्यांनी एका सरकारी अधिकाऱ्याची अभियानातल्या कामासाठी भेट घेतली. तेव्हा त्या अधिकाऱ्याने एकटं खोलीत भेटायला बोलावलं. त्याने अनेकदा अशी एकांतात भेटायची ऑफर दिल्याने महिला सरपंचांना त्या अधिकाऱ्याचा वाईट हेतू लक्षात आला.

मुख्यमंत्र्यांनंतर आता सुप्रिया सुळेंचाही 'संवाद' दौरा, गळती थांबवण्याचा प्रयत्न

अशाच प्रकारची ऑफर त्याने इतरही काही महिलांना दिल्याचं कळाल्याने रिंकू यांनी शेवटी पोलिसांमध्ये तक्रार केली. हा अधिकारी महिलांची कामं करताना अतीशय त्रास देत असल्याच्या तक्रारीही पुढं आल्या आहेत. बेटी बचाव बेटी पढाव या महिलांचं सक्षमीकरण करणाऱ्या योजनेतच  असे अधिकारी असतील तर त्या योजनेचं काय होणार असा सवाल या महिला सरपंचांनी केला आहे.

कोल्हापूरकरांचा स्वाभीमान आणि तावडे; संभाजी राजे म्हणतात, यापुढे बोलणार नाही

Loading...

विविध महिला संघटनांनी या घटनेचा तीव्र निधेष केला असून त्या सरकारी अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केलीय. अशा अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा अशीही मागणी होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 09:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...