News18 Lokmat

VIDEO हेलिकॉप्टर नादुरुस्त झालं तर खुद्द राहुल गांधी धावले पायलटच्या मदतीला

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. हे जेव्हा राहुल गांधींच्या लक्षात आलं तेव्हा ते स्वत: पायलटला मदत करायला पुढे आले.

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 11:54 PM IST

VIDEO हेलिकॉप्टर नादुरुस्त झालं तर खुद्द राहुल गांधी धावले पायलटच्या मदतीला

नवी दिल्ली 10 मे : प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना सगळ्याच नेत्यांचे प्रचार दौरे वेगात सुरू आहेत. दिवसभरात दोन ते तीन जाहीर सभा करत राहुल गांधी सर्व देश पिंजून काढत आहेत. हिमाचल प्रदेशातल्या ऊना इथं राहुल गांधी सभेसाठी शुक्रवारी आले होते. त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते स्वत:जाऊन पायलटला मदत करायला पुढे आले.


ऊना इथल्या सलोह मैदानावर त्यांचं हेलिकॉप्टर उतरलं तेव्हा दार लावताना अडचण येत असल्याचं राहुल गांधी यांनी पायलटच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर पायलटने तपासणी केली असता दरवाज्याच्याची रबरची पट्टी निघाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते दुरुस्तीचं काम सुरू असतानाच खुद्द राहु गांधी हे त्या पायलटला मदत करायला पुढे आले.


त्यांनी हेलिकॉप्टरचा दरवाजा धरला आणि पायलटला मदत केली. पायलट मध्ये बसल्यानंतर त्यांनी स्वत:दार बंद केलं. त्यांच्याच टीमच्या काही सदस्यांनी हा व्हीडीओ फेसबुकवर टाकला आणि तो व्हायरल झाला. त्यानंतर राहुल हे हेलिपॅडजवळच्या घरांमध्ये गेले आणि तरुणांशी संवाद साधला. त्या मुलांनी सेल्फी काढल्या आणि राहुल यांनी त्याचा व्हीडीओ आपल्या फेसबुकवरही शेअर केला.

Loading...

ब्रेन ट्यूमरने पीडित मुलीसाठी प्रियंका गांधींनी दिलं विमान

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी प्रचाराची दंगल सुरू असतानाच एका आजारी मुलीच्या मदतीसाठी धावून गेल्या. त्यांनी त्या मुलीला स्वत:च विमान देत दिल्लीत एम्स रुग्णालयात दाखल करत माणूसकीचं दर्शन घडवलं. प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना प्रियंकांनी केलेल्या या मदतीची चांगलीच चर्चा होत आहे.

प्रियंका गांधी या आज प्रयागराज इथं प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना कार्यकर्त्यांकडून त्या आजारी मुलीची माहिती कळली. त्या मुलीचा शहरातल्या कमला नेहरु रुग्णालयात ब्रेन ट्यूमरवरच्या उपाचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ते कुटुंब मुलीच्या उपचाराचा खर्च करू शकत नव्हते. तसच अधिक चांगल्या उपचारासाठी त्या मुलीला मोठ्या शहरात हलविण्यात यावं असा सल्लाही डॉक्टरांनी दिला होता.

ही माहिती कळताच प्रियंका गांधी यांनी त्या मुलीला तातडीने दिल्लीत हलविण्याचा आदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिला. काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला, हार्दीक पटेल आणि मोहम्मद अझरुद्दीन हे यावेळी प्रियंका गांधी यांच्यासोबत होते. मुलीला तातडीने दिल्लीला दाखल करण्यासाठी प्रियकांनी आपलं सहा आसनी विमान त्या मुलीसाठी दिलं. हार्दीक पटेल आणि अझरुद्दीन त्या मुलीच्या कुटुंबीयांना घेऊन दिल्लीकडे रवाना झाले. प्रियंका गांधी त्या मुलीची एम्समध्ये जाऊन भेट घेणार आहेत आणि काँग्रेस त्या मुलीच्या उपचाराचा खर्चही उचलणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2019 11:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...