Home /News /national /

धक्कादायक! आईचं आजारपण सांगून मिळवला पास, खोटं बोलून पोहचला रेड झोनमध्ये आणि...

धक्कादायक! आईचं आजारपण सांगून मिळवला पास, खोटं बोलून पोहचला रेड झोनमध्ये आणि...

कोरोनावर अजुन औषध निघालेलं नाही, त्यामुळे हर्ड इम्युनिटीमुळे फायदा होईल असं म्हटलं जात होतं.

कोरोनावर अजुन औषध निघालेलं नाही, त्यामुळे हर्ड इम्युनिटीमुळे फायदा होईल असं म्हटलं जात होतं.

चौथ्या टप्प्यात काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, याचा गैरफायदा अनेक जण घेताना दिसत आहेत.

    सोलन, 24 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान चौथ्या टप्प्यात काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, याचा गैरफायदा अनेक जण घेताना दिसत आहेत. हिमाचल प्रदेशच्या सोलनमध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला. इथं एका टॅक्सी चालकानं पैसे कमवण्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घातला. या वाहन चालकानं आईच्या आजारपणाचे कारण देत पास मिळवला आणि रेड झोनमध्ये तीन प्रवाशांना घेऊन गेला. यात एक लहान मुल, महिला आणि पुरुष यांचा समावेश होता. दरम्यान या तिघांना आता होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. एवढा सगळा प्रकार घडूनही याबाबत पोलिसांना काहीच माहिती नव्हती. त्यानंतर पोलिसांनी रेकॉर्ड पाहिल्यानंतर त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चालक, महिला आणि पुरुष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस अधिक्षक शिव कुमार यांनी सांगितले की, आईच्या आजारपणाचं कारण देत या चालकानं पास मिळवला, आणि सांगितले की 2 लोकांना घेऊन उत्तर प्रदेश जात आहे. मात्र तो एकटा गेला आणि येताना तीन लोकांना रेड झोनमध्ये घेऊन आला. त्यानंतर या चालकानं सरकारी केंद्रात क्वारंटाइन न होता होम क्वारंटाइन होणार असल्याचे सांगितले, मात्र त्यानंतरही तो बाहेर फिरत राहिला. वाचा-कोरोना संशयित वयोवृद्ध सरपटत चौथ्या मजल्यावरुन आले, पण तोपर्यंत... पोलिसांनी केली कारवाई पण... पोलीस आणि प्रशासन यांच्या नाका खालून इंद्रजित हा चालक खोटा पास घेऊन निघाला. इंद्रजित तिघांना रेड झोनमध्ये घेऊन गेला. त्यांना क्वारंटाइन करूनही ते फिरत राहिले. शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तपासात इंद्रजितची पोलखोल झाली. दरम्यान पोलिसांनी इंद्रजितनं सोडलेल्या महिला आणि पुरुषाविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. मात्र या सगळ्याप्रकारमुळं संपूर्ण शहराचा जीव धोक्यात आला आहे. वाचा-POSITIVE NEWS : पुण्यातील कोरोना टेस्टिंग लॅबच्या बाबतीत सकारात्मक निर्णय!
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या