लज्जास्पद! नात्याला काळिमा, सासऱ्यानं दारूच्या नशेत सुनेवर केला बलात्कार

सून आणि सासऱ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आहे. 50 वर्षांच्या सासऱ्यानं आपल्याच मुलाच्या पत्नीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 10:28 AM IST

लज्जास्पद! नात्याला काळिमा, सासऱ्यानं दारूच्या नशेत सुनेवर केला बलात्कार

शिमला, 28 जुलै : सून आणि सासऱ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आहे. 50 वर्षांच्या सासऱ्यानं आपल्याच मुलाच्या पत्नीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं नराधम सासऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिमाचल प्रदेशातील नालागडमधील रामशहर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे.

दारूच्या नशेत केला बलात्कार

'सासरे दारूच्या नशेत घरी आले आणि त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मी यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी बळाचा वापर करत मला खोलीत फरफटत नेलं आणि माझ्यावर अत्याचार केले',अशी आपबीती पीडित महिलेनं पोलिसांना सांगितली.

(वाचा : शरद पवारांकडून मोठा गौप्यस्फोट, CM फडणवीसांवरही गंभीर आरोप)

आरोपी सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Loading...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,'घडलेल्या गुन्ह्याची कसून चौकशी सुरू आहे. पीडित महिलेच्या काही वैद्यकिय तपासण्या केल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस लवकरच आरोपीला अटक करून पुढील चौकशी सुरू करणार आहेत'.

(वाचा : RBIमध्ये तैनात असलेल्या जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या)

(दृष्टिहीन मुलीवर जन्मदात्यानेच केला बलात्कार, पीडिता 2 महिन्यांची गरोदर)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जन्मदात्या बापानंच आपल्यावर मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मुलगी अंध असल्याचा फायदा घेत बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केले. याप्रकरणी नाशिकच्या ओझर पोलिसांनी नराधम बापास अटकही केली. अल्पवयीन पीडित मुलगी दृष्टिहीन असून एका आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. आश्रमशाळेच्या नियमानुसार दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि याच वैद्यकीय तपासणीत ही मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी संबंधित शिक्षकांनी या पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता तिने जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याची माहिती दिली. याप्रकरणी नाशिकच्या ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत दहा वर्षांची मुलगी बनली आई

मुंबईतला कामाठीपुरा देशभरात कुप्रसिद्ध आहे. याच कामाठीपुऱ्यातली एक 10 वर्षांची मुलगी आई झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मुलीची आई सावत्र असूनच तिनेच या चिमुकलीला वेश्याव्यवसायात ढकलले होते. त्यातूनच ती गर्भवती राहिली. नंतर सावत्र आईने तिची घरातून हकालपट्टी केली. एका रेल्वे स्टेशनजवळ सामाजिक कार्यकर्त्यांना ती आढळून आली आणि पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. माणुसकीला काळिमा फासणारी या चिमुकलीची सगळी कथा मन हेलावून टाकणारी आहे.

ही मुलगी पश्चिम बंगालमध्ये राहणारी आहे. वर्षभरापूर्वी तिच्या आईचे निधन झाले. नंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. दुर्दैवाने काही वर्षांनी तिच्या वडिलांचे निधन झाले. नंतर तिची सावत्र आई मुंबईत आली कामाठीपुऱ्यात दलालांच्या तावडीत सापडली. भाड्याने रुम देण्याचे आमिष दाखवून एका दलालाने तिला आपल्या घरात घेतले आणि नंतर त्या नराधमाने या 10 वर्षींच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची अट घातली.

पैशांची लालसा भोवली

पैशाच्या लालसेने त्या सावत्र आईने त्या चिमुकलीला त्या नराधमाच्या हवाली केले. नंतर इतरही लोक येऊन वासनेची भूक भागवू लागले. ही मुलगी या गोष्टीसाठी विरोध करत असे त्यावेळी ही सावत्र आई तिच्या शरीरावर चटके देत होती. काही दिवसांनी ती चिमुकली गर्भवती राहिली. हे त्या सावत्र आईला समजले तेव्हा तिने त्या चिमुकलीला घरातून हाकलून दिले. गर्भावस्था म्हणजे काय असतं हेही त्या चिमुकलीला माहीत नव्हते. अशा अवस्थेत ती मध्य रेल्वेच्या एका स्टेशनवर भीक मागून काही दिवस पोट भरत होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांना या मुलीची असाहाय स्थिती लक्षात आली. त्यांनी जेव्हा तिची आस्थेने चौकशी केली तेव्हा त्यांना त्या मुलीने आपली सर्व करुण कहाणी सांगितली. वैद्यकीय तपासणीनंतर ती नऊ महिन्याची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्या सामाजिका कार्यकर्त्यांनी नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आणि मुलीला एका हॉस्पिटलमध्ये दाखल केला. त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला आहे. पीडितेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी कामाठीपुऱ्यातून तिची सावत्र आई आणि दलालाला अटक केली आहे.

VIDEO: ऑनलाईन ऑर्डर करताय सावधान! तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 10:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...