• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 'ती' आई होती म्हणून... घरात घुसलेल्या बिबट्यापासून वाचला मुलाचा जीव

'ती' आई होती म्हणून... घरात घुसलेल्या बिबट्यापासून वाचला मुलाचा जीव

मुलाच्या रक्षणासाठी कितीही मोठ्या संकटाचा सामना करण्याचं सामर्थ्य आईमध्ये (Mother) असते. प्रसंगी जीवावर उदार होऊन आई मुलाचा जीव वाचवते. या आईने घरात घुसलेल्या बिबट्यापासून (Leopard) मुलाचं रक्षण केलं आहे.

 • Share this:
  शिमला, 21 जून : मुलाच्या रक्षणासाठी कितीही मोठ्या संकटाचा सामना करण्याचं सामर्थ्य आईमध्ये असते. प्रसंगी जीवावर उदार होऊन आई मुलाचा जीव वाचवते. या प्रकारची अनेक उदाहरणं आहेत. हिमाचल प्रदेशची (Himachal Pradesh) राजधानी शिमलामध्ये (Shimla) देखील असाच एक प्रकार घडला आहे. शिमलामध्ये घरात घुसलेल्या बिबट्यापासून (Leopard) आईनं मुलाचं संरक्षण केलं आहे. शिमलामध्ये बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. शहराच्या जवळच्या भागात यापूर्वी बिबट्याचा वावर होता. आता रहिवाशी भागातही बिबट्याचा संचार वाढला आहे. सोमवारी पहाटे तीन वाजता शहरातील स्थानिक बस स्टँडच्या जवळच्या एका घरामध्ये बिबट्या घुसला. बिबट्याला घरातील कुत्र्याचीा (Dog) शिकार करायची होती. पण, त्याने कुत्र्याजवळ झोपलेल्या तरुणावर हल्ला केला. बिबट्यानं त्या तरुणावर हल्ला केला. रात्रीच्या झोपेत झालेल्या हल्ल्याने त्या तरुणाला क्षणभर काही समजलेच नाही. बिबट्याने त्याचे डोके, डोळे आणि गळ्यावर जखमा केल्या. त्या तरुणाचा जगण्याचा संघर्ष सुरु होता. या आवाजाने जाग्या झालेल्या त्याच्या आईनं क्षणाचाही विचार न करता बिबट्यावर अंथरुण फेकून मारले. अचानक झालेल्या या हल्ल्याने बिबट्या गोंधळला. त्यानंतर तो बाथरूमध्ये पळाला. त्यावेळी महिलेनं प्रसंगावधान दाखवत बाथरूमचे दार बाहेरुन बंद केले. बिबट्याला बंद करताच त्यांनी या घटनेची माहिती फोन करुन पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस वन विभागाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने सर्वप्रथम बिबट्याला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात बंद केले. योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे आई होती म्हणून... बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला 18 टाके पडले आहेत. त्याच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. आईमुळेच आपला जीव वाचल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सरकारनं शहरात फिरत असलेल्या बिबट्यांना तातडीने पकडावं तसेच आपल्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: