करवाचौथच्या काही तास आधी पतीनं संपवलं जीवन, 2 पानांची लिहिली सुसाईड नोट

करवाचौथच्या काही तास आधी पतीनं संपवलं जीवन, 2 पानांची लिहिली सुसाईड नोट

दोन पानांची सुसाईड नोट लिहून पतीनं आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

मंडी, 04 नोव्हेंबर : पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नी करवाचौथ व्रत करते. उपास करते पूजा करते आणि त्यानंतर रात्री पतीचा चेहरा पाहून हा उपास सोडण्याची परंपरा आहे. मात्र त्याआधीच पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. 72 वर्षांच्या एका व्यक्तीनं आत्महत्या केली आहे. दोन पानांची सुसाईड नोट लिहून ही आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

72 वर्षीय व्यक्तीने बीबीएमबी कंट्रोल गेटजवळ खोल पाण्यात उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. लाल चंद शर्मा पुत्र पोपट राम रा. गाव धनेड पोस्ट ऑफिस पाटडीघाट तहसील, बुलवाडा जिल्हा मंडी असे मृताचे नाव आहे. ते गेल्या 40 वर्षांपासून खासगी आणि सरकारी क्षेत्रात लाकूड व कोळशाचे कंत्राटदार म्हणून काम मृत व्यक्ती काम करत होती.

हे वाचा-चिंताजनक! ज्या वयोगटात सर्वात कमी कोरोना संक्रमण त्यांच्यामार्फतच पसरतोय व्हायरस

लालचंदच्या कुटुंबात कर्करोगाशी झुंज देणारी पत्नी, दिव्यांग मुलगी आणि 4 मुली असं कुटुंब आहे. या व्यक्तीच्या स्कूटरमधून 2 पानांची सुसाईड नोट, मोबाईल फोन, 2500 रुपये आणि बँकेचे पासबुक उंदीर मारण्याचं औषध असं पोलिसांनी हस्तगत केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीनं घरासह कुटुंबाची जबाबदारी आपल्या भावावर सोपवली आहे. तसेच संपत्तीमधील वाटा आणि पैसे कोणाला देऊ नये हे देखील त्यांनी या सुसाईडनोटमध्ये लिहिलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी सुसाइडनोटच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 4, 2020, 4:28 PM IST
Tags: sucide

ताज्या बातम्या