मंडी, 16 ऑगस्ट : गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर भारतात मुसळधार पावसानं थैमान सुरू आहे. अनेक भागांमध्ये नदी नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इथे भूस्खलन होण्याचं प्रमाण वाढत आहे.
डोंगरावर असलेली माती अचानक झाड आणि दगडांना घेऊन खाली येत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या भूस्खलनात मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून जमीनदोस्त झाली आहे. यामध्ये जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पण भूस्खलनाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
भूस्खलनामुळे रस्त्यावर माती आली असून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रस्त्यावरून वाहन जात असताना हा प्रकार घडला. या व्हिडीओमध्ये पाहू शकाता हे भूस्खलन की भीषण प्रकारे झालं आहे. भूस्खलनात झाडंही उन्मळून पडली आहेत आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.