Home /News /national /

VIDEO मधून दिसेल निसर्गाचा प्रकोप! ढगफुटी, प्रलय, भूस्खलन... कुल्लू, शिमल्यात हाहाकार

VIDEO मधून दिसेल निसर्गाचा प्रकोप! ढगफुटी, प्रलय, भूस्खलन... कुल्लू, शिमल्यात हाहाकार

हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण व्हॅलीमध्ये आज बुधवारी सकाळी मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आणि त्यानंतर अचानक पूर आला. या पुरामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण बेपत्ता आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने दिली.

  शिमला, 6 जुलै: बऱ्याच राज्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत असून, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्येही (Himachal Pradesh Rain) जोरदार पाऊस सुरू असून, कुल्लूमध्ये ढगफुटी (Cloud Bursting) झाली आहे. ढगफुटीमुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलं असून, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याशिवाय अनेक सरकारी प्रकल्पांचं मोठं नुकसान झालंय. मणिकर्णमधील (Manikarn) टुरिस्ट कॅम्पचंही (Tourist Camp) मोठं नुकसान झालं आहे. तसंच या घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
  हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण व्हॅलीमध्ये आज बुधवारी सकाळी मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आणि त्यानंतर अचानक पूर आला. या पुरामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण बेपत्ता आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने दिली. अचानक आलेल्या पुरामुळे (Flood) चोज खोऱ्यातील अनेक घरं वाहून गेल्याचं कळतंय. ज्या भागात ढगफुटी होऊन पूर आला ते क्षेत्र प्रामुख्याने कॅम्पिंग साइट होतं. न्यूज एजन्सी एएनआयने मणिकर्ण व्हॅलीमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर परिसराचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये कॅम्पिंग साईट्स आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय. तसंच अनेक घरंही पाण्याखाली गेली आहेत.
  ‘पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती असून, बचाव पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. पुरात सहा जण बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे, त्यांचा शोध सुरू आहे. याशिवाय 7 घरांचं मोठे नुकसान झालं आहे आणि 3 प्रकल्पांनाही फटका बसला आहे. पुरामुळे धरणाचं पाणी सोडण्यात आलेलं नाही. यासोबतच नागरिकांना नद्यांच्या काठावर न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुरामुळे टुरिस्ट कॅम्प आणि घरांचं खूप नुकसान झालंय. सध्याची परिस्थिती पाहता लोकांनी घरातच थांबावं बाहेर पडू नये,’ असं आवाहन कुल्लूचे एसपी गुरदेव शर्मा यांनी केलं.
  ढगफुटी झालेल्या भागात मदत आणि बचाव कार्य सातत्याने सुरू आहे. स्थानिक प्रशासन लोकांना सुरक्षितस्थळी हलवत आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असताना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जाहीर केला आहे. कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी (River Water Level) वाढली आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. पार्वती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीचं पाणी आजूबाजूच्या गावात शिरलं आहे, अशी माहिती एसपी शर्मा यांनी दिली.
  First published:

  Tags: Himachal pradesh, Monsoon, Rain

  पुढील बातम्या