VIDEO : उपचारासाठी तडफडणाऱ्या 5 वर्षांच्या चिमुकलीसमोर डॉक्टरांची मुजोरी

VIDEO : उपचारासाठी तडफडणाऱ्या 5 वर्षांच्या चिमुकलीसमोर डॉक्टरांची मुजोरी

मुलीच्या पायात दोन फ्रॅक्चर झाले आणि त्यामुळे तिला मेडिकल कॉलेजमध्ये रेफर कऱण्यात आलं.

  • Share this:

हमीरपूर, 27 जून : माजी सैनिक असलेले वडील आपल्या मुलीला मेडिकल कॉलजच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले. मात्र तिथल्या डॉक्टर आणि परिचारकांनी उपचारासाठी नकार दिल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. 5 वर्षांच्या मुलीच्या पायात फ्रॅक्चर असल्यानं तिला उपचारासाठी रुग्णालयात आणलं मात्र डॉक्टरांनी पुढील उपचार केले नाहीत असा आरोप वडिलांनी केला.

मुलीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीचा अपघात झाला होता आणि तिला सुजानपूर येथील पाच वर्षाची मुलगी आरुषी हिला रुग्णालयात नेण्यात आले. मुलीच्या पायात दोन फ्रॅक्चर झाले आणि त्यामुळे तिला मेडिकल कॉलेजमध्ये रेफर कऱण्यात आलं. वडिलांनी सांगितले की, त्यांनी मुलीला दुपारी रुग्णालयात नेले होते. परंतु डॉक्टरांनी पाच तास मुलीची काळजी घेतली नाही. त्यांनी डॉक्टरांना अनेकदा उपचारासाठी विनवणी केली.

हे वाचा-मित्रांसोबत विना मास्क थिरकला नवरदेव, VIDEO व्हायरल होताच 25 जणांवर गुन्हा

मुलीच्या वडिलांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या विषयावर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना सोनी यांनी या प्रकरणी मिठाची गुळणी घेतली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात येणाऱ्यांवर उपचार होतात असंही त्यांनी सांगितलं आहे. मात्र या प्रकरणी सोनी या अनभिज्ञ असल्याचा आरोप चिमुकलीच्या वडिलांनी केला आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 27, 2020, 3:56 PM IST

ताज्या बातम्या