Home /News /national /

कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी औषधांपेक्षाही चहा प्रभावी; तज्ज्ञांचा दावा

कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी औषधांपेक्षाही चहा प्रभावी; तज्ज्ञांचा दावा

HIV विरोधी औषधांपेक्षाही कांगडा चहा (kangra tea) कोरोनावर प्रभावी ठरू शकते, असा दावा हिमाचल प्रदेशातील (himachal pradesh) तज्ज्ञांनी केला आहे.

    शिमला, 24 मे : कोरोनाव्हायरसविरोधात (coronavirus) आतापर्यंत ना कोणती लस ना कोणतं औषध. इतर आजारांवर उपलब्ध असलेल्या औषधांचं ट्रायल कोरोनाविरोधात केलं जातं आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एचआयव्हीची औषधं कोरोनावर उपचारासाठी प्रभावी ठरू शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे. मात्र एचआयव्ही (hiv) औषधांपेक्षाही कांगडा चहा (kangra tea) कोरोनावर प्रभावी ठरू शकते, असा दावा हिमाचल प्रदेशातील (himachal pradesh) तज्ज्ञांनी केला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, हिमाचल प्रदेशच्या पालमपूरमधील इन्स्टिट्युट ऑफ हिमालया बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीचे  (IHBT) डॉ. संजय कुमार यांनी कांगडा चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते, असं म्हटलं. आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त आयोजित वेबिनारदरम्यान संजय कुमार असं म्हणालेत. हे वाचा -  पहिल्यांदाच 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी समोर डॉ. संजय कुमार यांनी सांगितलं, "चहामध्ये असे रसायन असतात जे कोरोनाव्हायरसवर नियंत्रणासाठी एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत अधिक प्रभावी असू शकतात. आमच्या शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर आधारित मॉडेलचा वापर करून जैविक रूपानं सक्रिय 65 रसायन किंवा पॉलिफेनॉल्सचं परीक्षण केलं. जे विशिष्ट व्हायरल प्रोटिनला एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत अधिक कुशलेतेने जखडून ठेवू शकतात. मानवी पेशींत व्हायरसला प्रवेश करण्यात मदत करणाऱ्या व्हायरल प्रोटिनला  हे रसायन निष्क्रिय करू शकतात" हे वाचा - तुम्हालादेखील आल्याचा चहा आवडतो का? मग 'हे' वाचाच IHBT द्वारे चहा आधारित नैसर्गिक सुगंधित तेलयुक्त अल्कोहोल सॅनिटायझरचं उत्पादनही करत आहेत. तसंच चहाच्या अर्काचा वापर करून हर्बल साबणही तयार केले जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या साबणात अँटिबॅक्टेरिअल, अँटिव्हायरल गुण आहेत. हिमाचलातील दोन कंपन्यांमार्फत या साबणाचं उत्पादन आणि विपणन केलं जातं आहे. कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल अमेरिकेतील थिंक टँक मिल्कन इन्स्टिट्युटच्या ट्रॅकरनुसार कोरोनाव्हायसवर उपचारासाठी 130 पेक्षा जास्त औषधांचं परीक्षण सुरू आहे. काही औषधांमध्ये व्हायरसला रोखण्याची क्षमता असू शकते. तर काही औषधं रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रिय होण्यापासून रोखू शकतात. हे वाचा - कोरोनामुळे रखडली लसीकरण मोहीम; लस न मिळाल्याने तब्बल 8 कोटी मुलांचा जीव धोक्यात सीएसआयआरचे (Council of Scientific & Industrial Research - CSIR) राम विश्वकर्मा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं, "कोरोनाव्हायरसविरोधात सध्या एक प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे इतर आजारांवर उपचारासाठी मान्यता देण्यात आलेल्या औषधांचा कोरोनाव्हायरसवरील उपचारांसाठी प्रयोग. याचं एक उदाहरण म्हणजे रेमिडेसिवीर. या औषधामुळे लोकं लवकर बरे होण्यास मदत होत आहे. या औषधामुळे गंभीर रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. हे औषध जीवनरक्षक ठरू शकतं. फेविपिरावीर औषधदेखील आशादायक आहे" संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Tea

    पुढील बातम्या