मराठी बातम्या /बातम्या /देश /

धर्म परिवर्तनावर 10 वर्षांची शिक्षा; कायदा अधिक कडक, विधेयकाला मंजुरी

धर्म परिवर्तनावर 10 वर्षांची शिक्षा; कायदा अधिक कडक, विधेयकाला मंजुरी

जाणून घ्या नव्या कायद्याविषयी...

जाणून घ्या नव्या कायद्याविषयी...

जाणून घ्या नव्या कायद्याविषयी...

    नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : इतर राज्यांप्रमाणे हिमाचल प्रदेश विधानसभेतही सामूहिक धर्मांतरणावर शुक्रवारी एक कायदा पारित करण्यात आला आहे. या नव्या कायद्यातंर्गत जबरदस्तीने धर्म परिवर्तन केल्यास आता 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. यापूर्वी 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होती. हिमाचल प्रदेश सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. या वर्षाच्या शेवटी हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभेत द हिमाचल प्रदेश फ्रिडम ऑफ रिलिजन बिल, 2022 सर्वांच्या सहमतीने पारित करण्यात आलं आहे. या बिलमध्ये सामूहिक धर्म परिवर्तनाची व्याखा देण्यात आली आहे. त्यानुसार, जर एखादी व्यक्ती दोन किंवा त्याहून अधिक जणांचं धर्म परिवर्तन घडवून आणत असेल तर तो सामूहिक धर्मपरिवर्तन या श्रेणीत येईल, आणि त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. India@75 : जेव्हा एक हिंदू पाकिस्तानच्या संविधान सभेचा अध्यक्ष झाला; नंतर सोडवा लागला देश हिमाचल प्रदेश धर्म स्वातंत्र्य कायदा, 2019 ची ही एक अधिक कठोर आवृत्ती आहे. जी अवघ्या 18 महिन्यांपूर्वी लागू झाली. 2019 कायदा राज्य विधानसभेत मंजूर झाल्यानंतर 15 महिन्यांनी 21 डिसेंबर 2020 रोजी अधिसूचित करण्यात आला. 2006 च्या कायद्यात बदल करण्यात आला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Himachal pradesh, Religion

    पुढील बातम्या