काळाचा घाला ! जीपच्या खोल दरीत कोसळली, 5 जणांचा जागीच मृत्यू

काळाचा घाला ! जीपच्या खोल दरीत कोसळली, 5 जणांचा जागीच मृत्यू

कार अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील फागनी गावाजवळ हा अपघात झाला आहे.

  • Share this:

शिमला, 2 मे : कार अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील फागनी गावाजवळ हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 5 जण गंभीर जखमीदेखील झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बल्ह रोपा गावातील स्थानिक सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास टॅक्सीतून पधरच्या दिशेनं प्रवास करत होते. मात्र घरापासून काही अंतरावर पोहोचल्यानंतर फागनी गावाजवळ चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून ती खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. यानंतर तातडीनं पोलीस आणि अॅम्ब्युलन्स सेवेला याबाबतची माहिती देण्यात आली. मृतांमध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.

दरम्यान, पोलिसांकडून अपघाताची कसून चौकशी केली जात आहे.

वाचा अन्य बातम्या

India's Most Wanted: अर्जुन कपूरच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

पोलिसांनी मध्यरात्री नाइटीमध्ये केली अटक, मोहम्मद शमीच्या पत्नीचा गंभीर आरोप

VIDEO VIRAL प्रियांका गांधी खऱ्याखुऱ्या विषारी सापाशी खेळतात तेव्हा...

SPECIAL REPORT : मोदींविरोधात लढण्याआधीच माजी सैनिक हरला!

First published: May 2, 2019, 1:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading