Home /News /national /

11 वर्षीय मुलाच्या पोटात अडकला लॉलीपॉपचा पाईप, आतडं फाटलं पण...

11 वर्षीय मुलाच्या पोटात अडकला लॉलीपॉपचा पाईप, आतडं फाटलं पण...

मुलाला मरणाच्या दारातून जीवदान देण्याचं कर्तव्य नाहन मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी केलं आहे.

    नाहन, 16 मे : लॉलीपॉप खाताना त्यांचा दांडी (पाइप) मुलानं गिळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलाला मरणाच्या दारातून जीवदान देण्याचं कर्तव्य नाहन मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी केलं आहे. 11 वर्षांच्या मुलाच्या ग्रंथीमध्ये फसलेली लॉलीपॉपची पाइप डॉक्टरांनी सर्जरी करून बाहेर काढली आहे. नाहन मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी ही सर्जरी यशस्वीपणे केल्यानं त्यांचं कौतुक होत आहे. हे रुग्णालय आतापर्यंत कायम वादात राहिलं आहे पण या सर्जरीमुळे रुग्णालयातील डॉक्टरांचं खूप कौतुक होत आहे. डॉक्टरांच्या पथकाने 11 वर्षाच्या मुलाला केवळ नवीन जीवनच दिले नाही तर गरीब कुटुंबाला कोट्यवधी रुपये खर्च करण्यापासून वाचविले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिलाई परिसरात 11 वर्षांच्या अंकुशच्या पोटात सतत दुखत होतं. तपासणी केल्यानंतर पोटात प्लॅस्टिकचा पाईप असल्याचं लक्षात आलं. हा पाईप गिळल्यामुळे त्याचं आतड्याला इजा पोहोचली होती. मर्यादीत साधनं असूनही डॉक्टरांनी तातडीनं सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. हे वाचा-बिबट्याच्या जबड्यातून तरुणाच्या सुटकेचा थरार, तुम्ही कधीच न पाहिलेला VIDEO मुलानं चुकून गिळलेला 4 सेमीचा पाईप सर्जरी करून पोटातून काढला आहे. ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांना हा प्लास्टिकचा पाईप गुदाशयात अडकल्याचं आढळलं. थोडा उशीर झाला असता तर मल मुलाच्या पोटात फुटण्याची शक्यता डॉक्टरांनी पालकांना व्यक्त केली. या परिस्थिती मुलाच्या जीवाला धोका होता मात्र डॉक्टरांच्या टीमनं सर्जरी यशस्वीपणे केली असून पाईप बाहेर काढला आहे. सध्या या मुलावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. हे वाचा-436 किमीचा प्रवास...या फोटोमागची कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या