Load More
18 डिसेंबर : हिमाचल प्रदेश विधानसभा निकालाची थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होणार आहे. 68 जागांसाठी सरासरी 74 टक्के मतदान झालं. या निवडणुकीत भाजप - काँग्रेस थेट आमनेसामने आहेत. 68 जागांसाठी एकूण 60 विद्यमान आमदारांसह 337 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
काँग्रेसचे मावळते मुख्यमंत्री वीरभ्रद्र सिंग या निवडणुकीतही आपला करिष्मा कायम राखणार की लोक भाजपच्या हाती सत्ता देणार हे आज स्पष्ट होणार आहे. दरम्यान, एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्वच सर्वेमधून भाजपला 45ते 55 तर काँग्रेसला 13 ते 25 च्या आसपासच जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय.