नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: लहान वयात विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तींची यादी फोर्ब्स इंडियाने जाहीर केली आहे. यात धावपटू हिमा दास, क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि आयुषी अग्रवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30 ही यादी जाहीर केली आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत युट्यूबवरील ब्लॉगर प्राजक्ता कोहली, सिंगर मेघाना मिश्रा यांचा देखील समावेश आहे.
मनोरंजन, बिझनेस, क्रीडा अशा १६ विविध क्षेत्रातील व्यक्तींची ४ निकषाद्वारे निवड करण्यात आली आहे. या यादीत भारतातील 30 वर्षा खालील उद्योन्मुख प्रतिभावंतांचा समावेश केला आहे.
यादीत समावेश करण्यात आलेल्या कामगिराचा प्रभाव, त्यांनी सुरु केलेल्या उद्योगामुळे पर्यावरणाचे झालेले संरक्षण याचा विचार केल्याचे फोर्ब्स इंडियाचे संपादक ब्रायन कोर्वाल्हो यांनी सांगितले.
या यादीत 12 तरुणींचा तर 38 तरुणांचा समावेश करण्यात आला आहे.
VIDEO : प्रकाश जावडेकर म्हणतात, 'एवढ्या का घाबरल्या आहेत ममता?''