ट्रम्प यांना आव्हान देणाऱ्या हिलरी क्लिंटन यांचा मोठा निर्णय

हिलरी क्लिंटन यांनी 2016 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान दिले होते.

News18 Lokmat | Updated On: Mar 6, 2019 09:45 AM IST

ट्रम्प यांना आव्हान देणाऱ्या हिलरी क्लिंटन यांचा मोठा निर्णय

वॉशिंग्टन, 06 मार्च : अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी 2020 ला आपण राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र आपण वेगवेगळ्या प्रश्नांवर आणि मुद्द्यांवर आवाज उठवत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

2016 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन ट्रम्प यांच्याविरोधात उभ्या होत्या. हिलरी क्लिंटन म्हणाल्या की, मी आगामी निवडणूक लढणार नाही. पण माझे मुद्दे मी मांडत राहीन. माझ्या विचारसरणी ज्यावर माझा विश्वास आहे त्यासाठी लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्राध्यक्ष नाही तर मग गव्हर्नर किंवा महापौरपदाच्या निवडणुकीत उतरणार का असले विचारले असता त्यांनी सांगितले कि, मला नाही वाटत मी निवडणूक लढवेन. पण न्यूयॉर्कमध्येच राहणार आहे. तसेच राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभारही मानले.

गेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. आता 2020 च्या निवडणुकीत पुन्हा हिलरी क्लिंटन ट्रम्प यांच्या विरोधात उभा राहणार का? या चर्चांना क्लिंटन यांनीच पूर्णविराम दिला आहे.

SPECIAL REPORT : सेनेच्या खासदाराने काढली अमोल कोल्हेंची जात!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 09:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...