Home /News /national /

Hijab Controversy : हिजाब वादाचे देशभरात पडसाद; मात्र पंतप्रधानांच्या राज्यात हिजाबबद्दल काय आहेत नियम?

Hijab Controversy : हिजाब वादाचे देशभरात पडसाद; मात्र पंतप्रधानांच्या राज्यात हिजाबबद्दल काय आहेत नियम?

जाणून घ्या तेथील कॉलेजमध्ये मुस्लीम मुलींना कशी दिली जाते वागणूक..

    नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : कर्नाटकमधील (Karnataka) उडुपीमध्ये हिजाब (hijab) घातलेल्या विद्यार्थिनीना रोखल्यानंतर (Hijab Controversy) गदारोळ उठला आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. गुजरातमधील कॉलेजमध्ये वेगळाच माहोल असल्याचं सांगितलं जात आहे. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून मुस्लीम तरुणींना त्यांच्या पोशाखावरुन कोणतेच निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. इतकच नाही तर कॅम्पसमध्ये नमाज पठण करण्यावरदेखील रोख नाही. एलजे स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये थर्ड इयर बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचं शिक्षण घेणाऱ्या माहिदा शेखने सांगितलं की, जेव्हापासून मी येथे शिक्षण घेत आहे, तेव्हापासून हिजाब घालून येते. हिजाब घातल्यामुळे कॅम्पसमध्ये कोणी वाईट नजरेने पाहत नाही. आणि माझ्या चॉइसवर सवाल उपस्थित केला जात नाही. मुस्लीम विद्यार्थ्यांना कॉलेज मॅनेजमेंट खूप पाठिंबा देत असल्याचं तिने सांगितलं. गरज असेल तर नमाज पठण करण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करून दिली जाते. आलिया बागबान सीयू शाह कॉलेजमध्ये तृतीय वर्षात शिकते. तिने सांगितलं की, जेव्हा मी पहिल्या वर्षात होते तेव्हा हिजाब घालत नव्हते. मात्र आता हिजाबशिवाय जात नाही. कॉलेजमध्ये अनेक मुली बुरखादेखील घालतात. आम्ही असंच वर्गात जाऊन शिकतो. कोणीही नावं ठेवत नाही. कर्नाटक हिजाब विवादवर आलिया म्हणते की, भारतीय संविधानात सर्वांना समान हक्क आहे. मग ती मुस्लीम असो वा कोणी इतर. सर्वांना आपल्या आवडीनुसार कपडे घालण्याचा हक्क आहे. कॉलेजमध्ये मी काय घातलं हे ना माझ्यासाठी ना इतकांसाठी महत्त्वाचं आहे. अहमदाबाद मिररच्या रिपोर्टनुसार, हिजाबवरील वादाबद्दल महिला म्हणतात की, काय घालावं, की नाही हे सर्व वैयक्तित इच्छा आहेत. यावर निर्बंध असू नये. आम्ही कॉलेजमध्ये शिकायला येतो. आणि आमचं लक्ष तेथेच असायला हवं. हे ही वाचा-हिजाबच्या वादात प्रियंका गांधींचीही उडी; Tweet करत म्हणाल्या, 'बिकिनी किंवा...' ख्याति इस्न्टिट्यूट ऑफ फिजियोथॅरपीमध्ये नुकतच शिक्षण पूर्ण करणारी डॉक्टर सना शेखने सांगितलं की, जेव्हा मी येथे शिकत होते तेव्हा लॅबमध्ये एका वेळेसच नमाज पठणाची जागा नेमून दिली होती. लेक्चर्सच्यामध्ये आम्हाला ब्रेक दिला जात होता. आमच्या अनेक हिंदू मित्रांनी आमच्याकडून हिजाब घालणे आणि नमाज पठण करण्याची पद्धतीही शिकून घेतली होती. ख्याति ग्रुपचे चेयरमॅन कार्तिक पटेल यांनी अहमदाबाद मिररशी बोलताना सांगितलं की, एकदा विद्यार्थ्याने प्रवेश घेतला तर त्याला धर्म वा जातीच्या आधारावर जज केलं जात नाही. ज्या प्रकारे आम्ही गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देतो, त्या प्रमाणेत आम्ही मुस्ली विद्यार्थ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून देतो. एसएलयू कॉमर्स कॉलेजमध्ये पहिल्या वर्षांची विद्यार्थिनी सलोमी सांगते की, हिजाब घालण्यावरुन आम्हाला कोणी रोखत नाही. कर्नाटकातील वादाचा परिणाम संपूर्ण देशावर होत आहे. अहमदाबादमध्ये जमाते इस्लामी हिंद नावाची संस्था मुलींसाठी अनेक इस्लामी शिक्षण केंद्र चालवतात. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या आरिफा परवीन यांनी सांगितलं की, अद्याप आम्हाला कोणतीही शाळा वा कॉलेजमधून अशी तक्रार आलेली नाही, ज्यात हिजाब घालण्यासाठी कोणा मुलीने मदत मागितली. यासाठी आम्ही गुजरात सरकारचे धन्यवाद मानतो.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Gujrat, Muslim

    पुढील बातम्या