देशातले हे हायवे बनणार रन वे, हवाई दल करतंय युद्धाचा सराव

देशातले हे हायवे बनणार रन वे, हवाई दल करतंय युद्धाचा सराव

भारतीय हवाई दल लवकरच देशातले 22 महत्त्वाचे हायवे आणि एक्सप्रेस वे वर विमानं उतरवणार आहे. युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर आपली ताकद आजमावण्यासाठी हवाई दलाचा हा सराव आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : भारतीय हवाई दल लवकरच देशातले 22 महत्त्वाचे हायवे आणि एक्सप्रेस वे वर विमानं उतरवणार आहे. युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर आपली ताकद आजमावण्यासाठी हवाई दल हा सराव करणार आहे.

याआधी यमुना एक्सप्रेस वे आणि आगरा -लखनऊ एक्सप्रेस वे वर लढाऊ विमानं उतरवण्यात आली होती. बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर तर हवाई दलाची उमेद आणखी वाढली आहे.संरक्षण मंत्रालयाने देशातल्या सगळ्या हायवेंचं परीक्षण केलं. यातल्या काही हायवेंना मंजुरी देण्यात आली आहे. याआधी ग्रेटर नॉयडा ते आग्रा या यमुना एक्सप्रेस वे वर लढाऊ विमान उतरवण्याचा सराव करण्यात आला होता. लखनऊ - बलिया एक्सप्रेस वे सुद्धा हवाई दलाच्या यादीत आहे.

युद्धजन्य परिस्थितीत सराव

याशिवाय दिल्ली - मुरादाबाद एक्सप्रेस वे चं नावही यात आहे. मुरादाबाद एक्सप्रेस वे वर विमानं उतरवण्यासाठी मंजुरी मिळवण्यात आली आहे. या एक्सप्रेस वे वर लढाऊ विमानं उतरवली जाऊ शकतात.

गरज लागली तर छत्तीसगड, ओडिशा, जम्मू, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, आसाम, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान या राज्यांतही विमानं उतरवण्याची तयारी करण्यात आली आहे.

(हेही वाचा : Aarey कॉलनीमध्ये पं. नेहरूंनी लावलं होतं पहिलं झाड, त्यानंतर चढला काश्मीरचा साज)

अशा प्रकारे हायवेवर विमानं उतरवणारं भारतीय हवाई दल हे पहिलं नाही. सिंगापूर, स्वीडन, फिनलंड, जर्मनी, पोलंड, चीन या देशांतही लढाऊ विमानांची अशी लँडिंग करण्यात येतात.

पाकिस्तानमध्येही पेशावर ते इस्लामाबाद महामार्गावर पहिला रन वे करण्यात आला. इस्लामाबाद - लाहोर हायवेवरही लढाऊ विमानं उतरवली जातात.

============================================================================

EXCLUCIVE : जे चाललं ते योग्य नाही, शरद पवारांची UNCUT मुलाखत

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-412110" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDEyMTEw/"></iframe>

Published by: Arti Kulkarni
First published: October 7, 2019, 8:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading