Home /News /national /

उच्चशिक्षित पती-पत्नींनी राजकीय मतभेदातून मोडला 3 वर्षांचा संसार; पतीवर मारहाणीचाही आरोप

उच्चशिक्षित पती-पत्नींनी राजकीय मतभेदातून मोडला 3 वर्षांचा संसार; पतीवर मारहाणीचाही आरोप

या वादात पतीने पत्नीला मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

    सुरत, 18 जून : राजकीय मतभेदातून गुजरातमधील सुरत येथे एका तरुण इंजिनियर दाम्पत्याने घटस्फोट घेतला आहे. तरुणाची पत्नी ही आम आदमी पार्टी (आप) ची नगरसेविक आहे. नुकतेच या दाम्पत्याने एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला. 26 वर्षीय नगरसेवक रुता दूधागरा आता पती चिराग (28) विरोधात कायदेशीर पर्यायाचा शोध घेत आहे. त्यानंतरच ती तिच्या खासगी वस्तू शाळा आणि कॉलेजची मार्कशीट, ओळखपत्र आणि नगरसेवकासंबंधित कायदपत्र, लॅपटॉपसह अन्य महत्त्वाच्या वस्तू घेऊ शकेल. (divorce due to political differences Wife Aap corporator husband BJP leader ) पतीला घटस्फोटासाठी दिले 7 लाख इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनियरनी सांगितलं की, माझे पती गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार होते. त्यामुळे त्यांना 7 लाख रुपये दिले आणि त्यांनी माझे 90 ग्रॅमहून अधिक वजानाचं सोनं घेतलं  आहे. वेगळं होण्यासाठी त्यांना 7 लाख रुपये दिले होते, मात्र आता स्वत:च्या वस्तू घेण्यासाठी कायद्याची मदत घ्यावी लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे ही वाचा-Web Series पाहून रचला कट; कोरोनामध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरलाच अडकवलं जाळ्यात 3 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न दुधागरा यांना 54,754 वोट मिळाले होते. त्यांनी फेब्रुवारीमध्ये वार्ड 3, सरथाना-सिमाडामधून भाजप उमेदवाराला हरवलं. त्यांनी सांगितलं की, माझं राजकीय अनुभव नाही. मात्र मी आपसोबत कल्याणकारी कामांमध्ये सहभाग घेण्यास सुरूवात केली होती. त्यांनी मला नगरपालिका निवडणुकीचं तिकीट दिलं आणि सर्वाधिक मतांच्या अंतराने माझा विजय झाला. त्यांनी सांगितलं की, तीन वर्षांपूर्वी कम्प्युटर इंजिनिअर चिरागसोबत त्यांचं लग्न झालं होतं. रुताने सांगितलं की, माझे पतीसोबत साधारण वर्षभरापासून मतभेद सुरू होते, मात्र आम्ही कसंबसं सावरण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र माझ्या विजयाच्या काही आठवड्यात पतीने मला भाजपमध्ये सामील करण्यासाठी दबाव आणू लागले. त्यांना यासाठी कोट्यवधींचा प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. मात्र मी आम आमदी पक्ष सोडू इच्छित नव्हते. 93 मध्ये 27 जागा आप पक्षाजवळ नगरसेविकेने सांगितलं की, या वादात एप्रिलमध्ये चिरागने मला मारहाणदेखील केली होती. त्याचवेळी मी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. अजूनही तो मला धमकी देत आहे. आणि माझ्या वस्तू देण्यास विरोध करीत आहे. यासाठी मी कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहे. आप पक्षाने शहरातील पाटीदार भागात भाजपच्या 93 च्या तुलनेत 27 जागा जिंकल्या आहे
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: AAP, BJP, Surat

    पुढील बातम्या