Home /News /national /

देशात कोरोनाचा विस्फोट! 24 तासांत 606 रुग्णांचा मृत्यू, तर रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ

देशात कोरोनाचा विस्फोट! 24 तासांत 606 रुग्णांचा मृत्यू, तर रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ

गेल्या 24 तासांत देशात तब्बल 32,695 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह 606 रुग्णांचा मृत्यू झाला.

    नवी दिल्ली, 16 जुलै : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 32 हजार 695 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह 606 रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात आतापर्यंत सापडलेली सर्वात जास्त रुग्णांची नोंद आहे. यासह आता देशात एकूण 9 लाख 68 हजार 876 रुग्ण झाले आहे. सध्या देशात 3 लाख 31 हजार 146 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 6 लाख 12 लाख 815 लोक निरोगी झाले आहे. एकूण मृतांचा आकडा 24 हजार 915 झाला आहे. गेल्या 24 तासात 3 लाख कोरोना व्हायरस चाचणी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात 1 कोटी 27 लाख 39 हजार 490 लोकांची चाचणी झाली आहे. अशी आहे राज्यांची परिस्थिती अमेरिका, ब्राझील आणि भारतात सर्वात जास्त प्रकरणं जुलैमध्ये कोरोना विषाणूची गती वाढली आहे. या महिन्यात जगात दररोज सुमारे 2 लाख नवीन प्रकरणे येत आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 67 हजार प्रकरणे झाली आहेत.अधिक प्रकरणांच्या बाबतीत ब्राझील दुसर्‍या क्रमांकावर आहे तर अमेरिका अमेरिकेनंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जुलै महिन्यात रशियामध्ये काही प्रकरणे समोर आली आहेत. एकूणच सध्या भारत, अमेरिका, ब्राझील आणि रशियामध्ये 2 लाखाहून अधिक प्रकरणे आहेत. जगातील एकूण प्रकरणांपैकी हे प्रमाण 53% पेक्षा जास्त आहे. सर्वात जास्त 35.80 लाख प्रकरणे अमेरिकेत आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ब्राझीलमध्ये 19.40 लाख प्रकरणे नोंदली गेली. भारत 9.68 लाख आणि रशिया 7.46 लाख प्रकरणांसह हे देश अनुक्रमे तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या