'सारखी फोनवर असते पत्नी, स्वयंपाकही बनवत नाही; कृपया मला घटस्फोट द्या'

'पत्नीला फक्त तिच्या घरच्यांशी बोलायला आणि सारखं माहेरी जायला आवडतं. तिला सासरच्या कोणत्याही इतर नातेवाईकांशी बोलायचं नसतं.'

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 06:09 PM IST

'सारखी फोनवर असते पत्नी, स्वयंपाकही बनवत नाही; कृपया मला घटस्फोट द्या'

चंदीगड, 05 सप्टेंबर : अनेक कारणांमुळे आपण पती-पत्नीचा घटस्फोट होताना पाहिला आहे. पण पत्नी सारखी फोनमध्ये खेळत असते म्हणून एका व्यक्तीने घटस्फोट मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीपासून घटस्फोटासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. पत्नी दिवसभर फोनवर बोलत राहते आणि त्यामुळे ती स्वयंपाकही करत नाही. अशा परिस्थितीत त्याला सकाळी उपाशी कामावर जावं लागतं. त्यामुळे त्याला पत्नीपासून घटस्फोट हवा आहे असा आरोप पतीने याचिकेमध्ये केला आहे. यावर कोर्टाने त्याला फटकारत याचिका रद्द केली आहे. यापूर्वी या व्यक्तीने जिल्हा न्यायालयातही अपील केलं होतं, पण तिथेही त्याला यश आलं नाही.

इतर बातम्या - स्पामध्ये सुरू होतं SEX रॅकेट, तरुणींसोबत विवस्त्र होते लोक, अनेक कंडोम सापडले!

'सारखं माहेरी जात असते'

पत्नीला फक्त तिच्या घरच्यांशी बोलायला आणि सारखं माहेरी जायला आवडतं. तिला सासरच्या कोणत्याही इतर नातेवाईकांशी बोलायचं नसतं. बरं इतकंच नाही तर महिलेचे बाहेर प्रेम प्रकरण असल्याचंही पतीने म्हटलं आहे. पण यासगळ्याला पत्नीने नकार दिला आहे. उलट नवरा हुंड्यासाठी सारखा छळ करत असल्याचं पत्नीने कोर्टात सांगितलं.

अशा गोष्टी प्रत्येक जोडप्यामध्ये घडतात

Loading...

पतीने दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आणि पतीला समजही देण्यात आला. प्रत्येक जोडप्यांमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी घडतात. म्हणून परस्पर चर्चेने हा प्रश्न सोडवा. तसंच, फोनवर बोलणं किंवा स्वयंपाक न करणं ही क्रुरता नाही आहे असंही कोर्टाने म्हटले आहे. यानंतर कोर्टाने घटस्फोटाची याचिका फेटाळली. त्याचबरोबर कोर्टाने म्हटलं की, अशा याचिकांमुळे कोर्टाचा वेळ वाया जातो. पती-पत्नीने परस्पर वाटाघाटीद्वारे अशी प्रकरणे सोडवावीत. अशा परिस्थितीतघटस्फोट घेणं योग्य नाही. याचा परिणाम दोन कुटुंबांच्या तसंच जीवनावर होतो.

VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 06:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...