Home /News /national /

910 जणांना ब्लॅकमेक करुन पैसे उकळणारा सेक्सटॉर्शन टोळीचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात

910 जणांना ब्लॅकमेक करुन पैसे उकळणारा सेक्सटॉर्शन टोळीचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात

Crime News

Crime News

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दुर्ग जिल्ह्यात एका आधुनिक 'नटवरलाल'ला पकडले आहे. सायबर सेल आणि दुर्ग पोलिसांनी सेक्सटॉर्शन टोळीचा मास्टरमाइंड वकील अहमद याला 14 मार्च रोजी अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आणि गुन्ह्यांच्या नोंदी तपासल्यानंतर मोठा खुलासा झाला आहे.

पुढे वाचा ...
    दुर्ग, छत्तीसगड : अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारी, ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून खंडणी वसूल करणं, सेक्सटॉर्शन आदी गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. ब्लॅकमेलिंग, फसवणूक आदी गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध असलेला गुन्हेगार नटवरलाल (Natwarlal) तुम्हाला माहिती असेलच. या नटवरलालच्या जीवनावर नंतर चित्रपटदेखील आला होता. छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) नुकतीच अशीच एक घटना घडली आहे. दोन वर्षांत सुमारे 910 लोकांना ब्लॅकमेल (Blackmail) करून त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल करणाऱ्या आधुनिक नटवरलालला पोलिसांनी 14 मार्च रोजी अटक केली आहे. छत्तीसगडमधल्या दुर्ग (Durgh) येथे सायबर सेल (Cyber Cell) आणि जिल्हा पोलिसांनी एका मोस्ट वॉंटेड (Most Wanted) यादीतील गुन्हेगाराला (Criminal) अटक केली आहे. हा गुन्हेगार आधुनिक नटवरलालच म्हणावा लागेल. वकील अहमद असं त्याचं नाव असून, तो सेक्सटॉर्शन टोळीचा (Sextortion Gang) मास्टरमाईंड आहे. हरियाणातल्या मेवात भागात राहून तो तंत्रज्ञानाचा वापर करून सेक्सटॉर्शनसारखे गुन्हे करत होता. याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता आणि गुन्ह्यांच्या नोंदी तपासल्यानंतर मोठा खुलासा झाला आहे. वकील अहमदने गेल्या दोन वर्षात 910 लोकांना ब्लॅकमेल केलं. यापैकी 467 पीडितांनी केंद्र सरकारच्या नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर (National Cyber Crime Portal) तक्रार दाखल केली होती. यात तेलंगणातून 78 तक्रारींची नोंद झाली होती. छत्तीसगडमध्ये दुर्गसह आणखी दोन जिल्ह्यात या टोळीवर गुन्हे दाखल आहेत. केवळ 83 प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल आहे. दुर्गमध्ये 40 तक्रारी समोर आल्या आहेत. वकील अहमदची टोळी प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य बनवत असल्याची धक्कादायक बाब या प्रकरणांमधून स्पष्ट झालं आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना ही टोळी लुटत असे. याबाबत एससीपी संजय धुव्र यांनी सांगितलं, ``सायबर सेल आणि बोरी पोलिसांच्या पथकानं ज्या आरोपीला अटक केली आहे, तो मोस्ट वॉंटेड गुन्हेगार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सायबर सेल आणि बोरी पोलिसांमार्फत तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीने मिळून अनेक राज्यांतील 910 जणांची फसवणूक (Fraud) केली आहे. या टोळीवर आतापर्यंत 83 गुन्हे दाखल आहेत.`` मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांत 910 लोक सेक्सटॉर्शनचे बळी ठरले आहेत. त्यांना धमकावून त्यांच्याकडून 3 कोटींहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली आहे. सायबर पोर्टलवर 467 गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्यात दुर्गमधील सर्वाधिक तक्रारींचा समावेश आहे. असा झाला टोळीचा पर्दाफाश एका रेल्वे कर्मचाऱ्यानं सुमारे 10 दिवसांपूर्वी पोलिसांशी संपर्क साधला होता. सेक्सटॉर्शनच्या नावाखाली माझ्याकडे 35 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचं या कर्मचाऱ्यानं पोलिसांना सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिली मैत्री केली. यानंतर अश्लील व्हिडिओ पाठवून त्यांचे अश्लील कृत्य आपल्या मोबाईल स्क्रिनवर रेकॉर्ड केले. त्यानंतर आरोपी ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत, पैशांची मागणी करत होते, असं या कर्मचाऱ्यानं सांगितलं. सोमवारी एका नगरसेवकानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी सेक्सटॉर्शनसाठी पैशांची मागणी करत असल्याचं त्यानी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी सर्वप्रथम आरोपींचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. त्यानंतर नगरसेवकाचं सोशल मीडिया अकाउंट (Social Media Account) डिअ‍ॅक्टिव्हेट केलं. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी त्यांना ब्लॅकमेल करत आणि आणखी पैशांची मागणी करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
    First published:

    Tags: Crime news, Cyber crime

    पुढील बातम्या