मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त 13 तासात; लवकरच हायस्पीड ट्रेन धावणार

मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त 13 तासात; लवकरच हायस्पीड ट्रेन धावणार

ही एक्स्प्रेस बांद्रा आणि निजामुद्दीन या दोन स्थानकांमध्ये धावेल. या गाडीला चौदा डबे असतील. तसंची ही ट्रेन दिवाळीपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते आहे.

  • Share this:

मुंबई,19 सप्टेंबर: मुंबई दिल्ली प्रवास आता फक्त तेरा तासात करता येणार आहे. लवकरच 150 किलोमीटर ताशी वेगाने धावणारी हायस्पीड राजधानी एकस्प्रेस रेल्वे मंत्रालय सुरू करणार आहे.

ही एक्स्प्रेस बांद्रा आणि निजामुद्दीन या दोन स्थानकांमध्ये धावेल. या गाडीला चौदा डबे असतील. तसंची ही ट्रेन दिवाळीपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच या ट्रेनचं परिक्षण सुरू होणार आहे.

सध्या मुंबई- दिल्ली अंतर साडेपंधरा तासात पूर्ण करणारी राजधानी एक्स्प्रेस या दोन शहरांमध्ये धावते आहे,तर 17 तासात हेच अंतर पूर्ण करणारी ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसही आहे.पण या दोन्ही ट्रेन्स बांद्रा स्थानकावर थांबत नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 10:39 AM IST

ताज्या बातम्या