कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार 10 राज्यात पाठवणार पथक

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार 10 राज्यात पाठवणार पथक

केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या 10 राज्यांमध्ये मदतीसाठी पथक पाठवणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 मे : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आता केंद्रीय आरोग्य मंत्रालय 10 राज्यात पथक पाठवणार आहे. मंत्रालयाकडून शनिवारी ही माहिती देण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागांना कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असेल्या भागात कशा प्रकारे उपाययोजना करता येतील यासाठी हे पथक मदत करणार आहे. या केंद्रीय पथकात आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, एक संयुक्त सचिव स्तरावरील नोडल अधिकारी आणि एक सार्वजनिक आरोग्य तज्ञ यांचा समावेश असेल.

केंद्र सरकारची ही टीम गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पाठवण्यात येईल. या सर्व राज्यात कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मंत्रालयानं म्हटलं की हे पथक त्यांच्या सार्वजनिक आरोग्य तज्ञांच्या 20 केंद्रीय पथकांहून वेगळं आहे. ही 20 पथकं याआधीच कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट असलेल्या जिल्ह्यात पाठवण्यात आली होती.

याआधी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना लागू करण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी देशातील 10 राज्यात 20 केंद्रिय पथकं पाठवली होती. त्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडु, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश होता.

हे वाचा : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 20000 पार; दिवसभरात 48 मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी गुजरात आणि महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे वाढत्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, गृह मंत्रालयानं पश्चिम बंगालला एक पत्र पाठवल होतं. त्यात म्हटलं होतं की, देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूदर पश्चिम बंगालमध्ये आहे तर टेस्टिंग सर्वात कमी होत आहे.

हे वाचा : भारतात गेल्या 11 दिवसांत कोरोनाचा कहर, तरीही देशासाठी दिलासादायक बातमी

दरम्यान, देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजारांवर पोहोचला असून 731 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. गुजरातमध्ये 7402 रुग्ण आढळले असून 429 जणांचा मृत्यू झाला आहे.

पाहा VIDEO: कोरोनाच्या विळख्यात मुंबईकरांसाठी आली Good News, पहिल्यांदाच घडलं असं

First published: May 9, 2020, 11:18 PM IST

ताज्या बातम्या