Elec-widget

पुलवामासारखा हल्ला पुन्हा होऊ शकतो; अलर्ट जारी

पुलवामासारखा हल्ला पुन्हा होऊ शकतो; अलर्ट जारी

पुलवामा सारखा हल्ला पुन्हा होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

  • Share this:

श्रीनगर, 14 एप्रिल : फेब्रवारीमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर, सुरक्षेच्या दृष्टीनं जम्मू – श्रीनगर हायवेची पाहणी करत काही उपाय देखील केले. दरम्यान, आता पुलवामासारखा हल्ला पुन्हा होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला असून हल्ल्यासाठी बाईकचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती आहे. अलर्टनंतर आता सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सुरक्षा दलांच्या हालचालींवर देखील स्थिगिती आणण्यात आली आहे. शिवाय, श्रीनगरमधील मोबाईल आणि इंटरनेट सेवेवर देखील बंदी आणण्यात आली आहे. 30 मार्च रोजी देखील बनिहाल येथे जम्मू – श्रीनगर हायवेवर जवानांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. पण, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली होती. त्यानंतर दहशतवादी पुन्हा एकदा जवानांना लक्ष्य करण्याच्या तयारीमध्ये आहेत. पण, लष्करानं देखील सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत.


किश्तवाडमधील RSS नेत्याच्या हत्येमागे दहशतवाद्यांचा हात


हायवे दोन दिवस बंद

Loading...

जवानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मोठा निर्णय घेत जम्मू – श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आठवड्यातून दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 31 मे पर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. रविवार आणि बुधवार असे दोन दिवस या महामार्गावरून वाहतूक बंद असणार आहे. दरम्यान, याविरोधात विरोधी पक्षांनी आवाज देखील उठवला आहे.


NIAकडे तपास

पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण तपास हा एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळून आत्मघातकी स्फोट करण्यात आला होता. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. घाटीमध्ये सध्या दहशतवादी कारवाया वाढल्या असून जवानांनी केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत टॉपच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.


धक्कादायक! टोल नाक्यावर गाडी अडवल्यानं कर्मचाऱ्याला 8 किमी फरफटत नेलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...