S M L

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांत हाय अॅलर्ट

दिल्लीच्या जामा मशीद परिसरात संशयित अतिरेकी घुसल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशातील काही प्रमुख शहरांत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी पोलिसांना २६ जानेवारीपर्यंत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Jan 14, 2018 03:08 PM IST

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांत हाय अॅलर्ट

14 जानेवारी : दिल्लीच्या जामा मशीद परिसरात संशयित अतिरेकी घुसल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशातील काही प्रमुख शहरांत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी पोलिसांना २६ जानेवारीपर्यंत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्ली पोलिसांना जामा मशीद परिसरातील हॉटेलमध्ये तीन दहशतवादी लपल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या हॉटेलची झाडाझडती घेतली होती. पण तिथे अतिरेकी आढळून आले नव्हते. त्यातच काही अतिरेक्यांच्या संभाषणाचे इनपूटही मिळाले आहेत. हे तिघेही पस्तो भाषेत संभाषण करत असल्याचं उघड झालं आहे. या अतिरेक्यांचं अफगाणिस्तानशी कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आहे. पाकिस्तानमध्ये या तिघांचंही ट्रेनिंग झालं असून काश्मीरच्या पुलवामामधून त्यांना भारतात घातपात घडविण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे गुप्तचर खात्यानं एका सांकेतिक कॉलच्या आधारे हा अलर्ट जारी केला आहे.

जामा मशीद परिसरात अतिरेकी घुसल्याने आणि प्रजासत्ताक दिन जवळ आल्याने सुरक्षा यंत्रणांनी दिल्लीसह उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या प्रमुख शहरांमध्ये हाय अॅलर्ट जारी केला असून पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच देशातील या प्रमुख शहरांमध्ये विमानतळावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयसह लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन, अल-कायदा आणि जैश-ए-मोहम्मद आदी अतिरेकी संघटना प्रजासत्ताक दिनी सक्रिय होऊ शकतात, असा इशाराही सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2018 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close