नॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया आणि राहुल गांधी यांना मोठा झटका

नॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया आणि राहुल गांधी यांना मोठा झटका

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली हायकोर्टाने 56 वर्ष जुन्या हेराल्ड हाऊसला रिकामं करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली हायकोर्टाने 56 वर्ष जुन्या हेराल्ड हाऊसला रिकामं करण्याचे आदेश दिले आहेत. फक्त 2 आठवड्यांच्या आत हेराल्ड हाऊस रिकामं करा नाहीतर कारवाई केली जाईल असा इशाराही कोर्टाकडून देण्यात आला आहे.

नॅशनल हेराल्डच्या प्रकाशकांनी नागरी विकास मंत्रालयाच्या 30 ऑक्टोबरच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. या निर्णयामध्ये हाऊसचं 56 वर्ष जुनं लीज संपवून आयटीओच्या प्रेस एनक्लेव बिल्डिंगला खाली करण्यासाठी सांगितलं गेलं होतं. त्यावर प्रकाशकांनी कोर्टात आव्हान दिलं होतं.

या याचिकेमध्ये आरोप लावण्यात आला होता की, लँड आणि डेव्हलपमेंट ऑफिसचा आदेश बेकायदेशीर, असंवैधानिक, मनमानी आणि कोणत्याही अधिकार नसताना जारी करण्यात आला आहे.

यापूर्वी, केंद्र सरकारने इमारतीची लीज संपल्यानंतर 15 नोव्हेंबरपर्यंत इमारत रिकामी करण्याचा आदेश दिला होता. मात्र ती इमारत खाली करण्यात आली नव्हती. भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली होती. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना जेलमध्ये पाठवण्याबाबत त्यांनी केलेलं वक्तव्य वादातही सापडलं होतं.

'या वर्षाअखेरीस नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधीही लवकरच जेलममध्ये जातील. त्यामुळे आगामी अखिल भारतीय काँग्रेसची बैठक तिहार जेलमध्ये होणार' असल्याची उपहासामत्मक टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. पटियाला हाऊस न्यायालयाने राहुल आणि सोनिया यांना फसवणूक आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. यंग इंडियाने फक्त 50 लाख रुपयांच्या बदल्यात असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप सोनिया आणि राहुल यांच्यावर करण्यात आला होता.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात डिसेंबर 2015 रोजी सोनिया आणि राहुल गांधी पटियाला हाऊस न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता.


Special Report: तुमच्यातही माणुसकी असेल पण मुंबईच्या या टॅक्सी चालकांमध्ये नाही... रुग्ण बनून टॅक्सीवाल्यांसोबत केलेलं हे स्टिंग ऑपरेशन याचा पुरावा आहे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 03:33 PM IST

ताज्या बातम्या