Home /News /national /

...म्हणून देशातील गरीब उपाशी; भूकबळीबद्दल काय म्हणाले राहुल गांधी?

...म्हणून देशातील गरीब उपाशी; भूकबळीबद्दल काय म्हणाले राहुल गांधी?

इंडोनेशिया, नेपाळ, पाकिस्तान, बांग्लादेशांपेक्षा भारताची परिस्थिती गंभीर आहे

    नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर हल्ला करणारे काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जागतिक भूकबळी 2020 मध्ये (Global Hunger Index) भारतातली स्थितीबाबत सरकारवर निशाणा साधला आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भूकबळी प्रकरणात 107 देशांपैकी भारताला 94 व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. राहुल गांधींनी या जागतिक सूचीच्या माध्यमातून सरकारवर आपल्या काही मित्रांचे खिशे भरावे लागत असल्याचा आरोप लावला आहे. राहुल गांधींनी शनिवारी ट्विट करुन लिहिलं आहे की, भारतातील गरीब उपाशी आहे कारण सरकार केवळ आपल्या काही मित्रांचे खिसे भरुन देण्यात व्यस्त आहे. जोपर्यंत भूकबळी आणि कुपोषणाचा मुद्दा आहे हिंदुस्तान आपल्या शेजारील नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशांहून मागे आहे. 107 देशांच्या या सूचीत भारत 94 व्या स्थानावर आहे. रिपोर्टनुसार सध्या भारत भूकबळीच्या अशा स्तरावर आहे, जो गंभीर मानला जातो. GHI 2014मध्ये 55 व्या स्थानावर होते. भारत 2019 मध्ये 102 स्थानावर आला आहे. यादीतील देशांची टक्केवारी दरवर्षी कमी-जास्त होत असल्याचे दिसते. राहुल गांधी विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणणे अवघड जात आहे. राहुल गांधींनी 16 ऑक्टोबर रोजी यासंदर्भात ट्विट केलं होतं. इंडोनेशिया, नेपाळ, पाकिस्तान, बांग्लादेशांपेक्षा भारताची परिस्थिती गंभीर आहे
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rahul gandhi

    पुढील बातम्या