हेमंत सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, जनतेने दिली दुसऱ्यांदा संधी

हेमंत सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, जनतेने दिली दुसऱ्यांदा संधी

हेमंत सोरेन हे दुसऱ्यांदी राज्याचे नेतृत्त्व करत आहेत.

  • Share this:

रांची,29 डिसेंबर: झारखंड मुक्ति मोर्चाचे (JMM) कार्यकारी अध्‍यक्ष हेमंत सोरेन यांनी रविवारी झारखंड राज्याच्या मुख्‍यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत सोरेन यांच्यासह त्यांच्या तीन मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. हेमंत सोरेन हे दुसऱ्यांदी राज्याचे नेतृत्त्व करत आहेत.

हेमंत सोरेन यांच्यासोबत झारखंडचे कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते आलमगीर आलम यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. चौथ्यांदा आमदार बनलेले आलमगीर आलम हे झारखंड विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. याशिवाय काँगेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.रामेश्वर उरांव यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. सध्या मंत्रिमंडळात तीन मंत्र्यांचा समावेश आहे. झारखंडच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून त्यात 12 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

'देशातल्या सर्व नेत्यांनी यांचा आदर्श घ्यावा', नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

झारखंड विधानसभा निवडणुकीत झामुमोचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्या आघाडीने बहुमत मिळवले. भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यात यश आल्यानंतर रविवारी 29 डिसेंबरला सोरेन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर त्यांचे समर्थक आणि चाहते पुष्पगुच्छ पाठवून अभिनंदन करत आहेत. यावर हेमंत सोरेन यांनी त्यांच्या समर्थकांना आणि लोकांना एक आवाहन केलं आहे. त्यांनी ट्विटरवरून केलेल्या या आवाहनाची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.

झामुमो अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, सहकाऱ्यांनो, झारखंडमधील जनतेच्या प्रेमाने आणि आदराने मला भरून आलं आहे. पण मी तुम्हाला एक विनंती करतो की मला फुलांच्या बुकेऐवजी ज्ञानाने भरलेली बुक द्या. तुमच्या आवडीचं कोणतंही पुस्तक मला द्या. मला खूप वाईट वाटतं की तुम्ही दिलेल्या फुलांना मी सांभाळू शकत नाही. तुमच्याकडून दिलेल्या पुस्तकावर नाव लिहा. ती पुस्तके ग्रंथालयात ठेवली जातील आणि तुमची ही प्रेमाची भेट आमच्या सर्वांचे ज्ञान वाढवेल.

हेमंत सोरेन यांचे हे आवाहन आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून युजर्सनी या आवाहनाचे कौतुक केलं आहे.देशातील प्रत्येक नेत्याने असं करायला हवं असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. फुलांऐवजी पुस्तक देणं केव्हाही चांगलं अशा प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत.

झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी हेमंत सोरेन यांनी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांच्यासोबत झामुमो प्रमुख शिबू सोरेन, झारखंड काँग्रेसचे प्रभारी आरपीएन सिंग, राजद नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे टीएस सिंहदेव उपस्थित होते.

23 डिसेंबरला झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यात 81 पैकी 47 जागा जिंकून आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले. यात झारखंड विकास मोर्चाने 3 आमदारांसह आघाडीला पाठिंबा जाहीर केला. झामुमोने सर्वाधिक 30 तर काँग्रेसने 16 आणि राजदने 1 जागा जिंकली. दुसरीकडे भाजपला 25 जागा जिंकता आल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2019 03:20 PM IST

ताज्या बातम्या