News18 Lokmat

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हेमा मालिनींची मोठी घोषणा

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हेमा मालिनी यांनी मोठी घोषणा केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 10:03 PM IST

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हेमा मालिनींची मोठी घोषणा

मथुरा, 25 मार्च : भाजप खासदार हेमा मालिनी यांनी मथुरामधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी यंदाची निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असून यापुढे मी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. 2024मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षासाठी काम करणार असल्याची माहिती देखील यावेळी हेमा मालिनी यांनी केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी हेमा मालिनी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत वृंदावनमधील मंदिरामध्ये पुजा देखील केली. मथुरेच्या विकासाठी बरंच काही केलं.अद्यापही बरंच काही करायचं बाकी आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षामध्ये देखील शक्य तेवढी विकासकामं करणार असल्याचं 70 वर्षीय हेमा मालिनी यांनी म्हटलं.


निरुपमांची गच्छंती, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरांची नियुक्ती


'मथुरेच्या विकासासाठी केलेली कामं आठवत नाहीत'

Loading...

भाजप खासदार हेमा मालिनी यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली आहे. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हेमा मालिनी यांनी अजब असं उत्तर दिलं. मथुरेच्या विकासासाठी मी खूप कामं केली. पण, मला आता केलेली कामं आठवत नाहीत. मला जनतेनं निवडून दिलं आहे. मी कायम त्यांच्या विकासासाठी काम करत राहीन. यावेळी हेमा मालिनी यांनी विरोधकांवर देखील टीका केली. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मथुरामध्ये येऊन जावं. मग त्यांना किती विकास झाला हे कळेल असा टोला लगावला. मी विकास कामं केली असून लोक मला पुन्हा निवडून देतील असा विश्वास देखील हेमा मालिनी यांनी व्यक्त केला.


शिवसेनेचे राज्यमंत्री चक्क आदित्य ठाकरेंच्या पाया पडले, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 10:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...