Fani Cyclone : नागरिकांना मदतीचा हात द्या; राहुल गांधींचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश

Fani Cyclone : नागरिकांना मदतीचा हात द्या; राहुल गांधींचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश

फानी दरम्यान मदतीला जा असे आदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मे : ओडिसा, पश्चिम बंगालसह किनारी भागांना फानी चक्रीवादळाचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. यावेळी लोकांना मदतीला धावून जा असे आदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. ट्विटरवर राहुल गांधी यांनी ओडिसा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशातील कार्यकर्त्यांना मदतीला जा असं सांगितलं आहे. दुपारपर्यंत चक्रीवादळ ओडिसामध्ये धडकण्याची शक्यता आहे. फानीचा सामना करण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे. एनडीआरएफचे 4000 जवान देखील तैनात करण्यात आले आहेत.

वादळी पाऊसवाऱ्यासह फानी चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं

भारतीय लष्कर – दहशतवाद्यांमध्ये चकमक; बुरहान वाणीच्या गँगमधील या दहशतवाद्याचा खात्मा?

फानी चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर आज धडकणार आहे. हे वादळ ओडिशाच्या दिशेनं सरकलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फानी चक्रीवादळ वेगानं पुढे सरकत आहे. आज दुपारपर्यंत हे वादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता होती, मात्र हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सकाळी 8 ते 10 वाजेदरम्यानच फानी चक्रीवादळ पुरी शहरातील गोपाळपूरमध्ये पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगालला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.

10 हजार गावांना बसणार फटका?

फानी चक्रीवादळामुळे ओडिशातील जवळपास 10,000 गावं आणि 52 शहरांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 11.5 लाख लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे.

VIDEO : वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षण मिळणार की नाही? चंद्रकांत पाटील म्हणतात..

First published: May 3, 2019, 9:08 AM IST

ताज्या बातम्या