उंची केवळ 3 फूट 9 इंच, औषध घेऊनही उंची न वाढल्याने 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या

उंची केवळ 3 फूट 9 इंच, औषध घेऊनही उंची न वाढल्याने 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या

उंची वाढविण्यासाठी तिने एका प्रसिद्ध ब्रॅंडची आयुर्वेदिक पावडर घेण्यास सुरुवात केली होती मात्र...

  • Share this:

सुरत, 11 फेब्रुवारी : मुलं माझ्याहूनही उंच आहेत..माझी उंची कधी वाढणार? वय 22 वर्षे... मात्र दिसते अगदी लहान मुलीसारखी, आफरीनच्या डोक्यात हा प्रश्न सतत सतावत होता. तीन महिन्यांपासून ती आयुर्वेदिक चूर्ण तीन तीन बाटल्या संपवत होती. मात्र काही परिणाम झाला नाही. एके दिवशी सर्व संपलं. आफरीनने शेवटी वैतागून आत्महत्याच केली. आपल्या लहान मुलाच्या उंचीमुळे ती डिप्रेशनमध्ये गेल्याचे बोलले जात होते. सोमवारी तिने आपल्या सूरतच्या घरी सीलिंग फॅनला लटकून गळफास घेतला. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ही घटना सचिन जीआईडीसी परिसरातील मगदूलनगर येथे घड़ली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या पतीला एक वस्तू आणण्यासाठी बाजारात पाठवले. अनवर एक फोटो स्टुडिओ चालवतो. एका तासानंतर जेव्हा तो आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याने आफरीनला पंख्याला लटकलेले पाहिले. अनवर आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले, की आफरीन आपल्या उंचीमुळे खूप डिप्रेशनमध्ये होती.

Teddy आणि Rose च्या जागी दिलं असं गिफ्ट की, पुणे पोलिसांचं तुम्हीही कराल कौतुक

तिची उंची 3 फूट 9 इंच इतकी होती. तर तिच्या पतीची उंची 5 फूट 4 इंच इतकी होती. आफरीनने तीन महिन्यांपूर्वी एक जाहिरात बघून उंची वाढविण्यासाठी एका प्रसिद्ध ब्रॅंडचे आयुर्वेदिक पावडर घेण्यास सुरुवात केली होती. मात्र याचा काही परिणाम झाला नाही. उलट तिचं डिप्रेशन वाढत होतं. अनवरने एक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा कौटुंबिक कार्यक्रम वा फिरायला गेल्यावर ती घरी आल्यावर आपल्या कमी उंचीचं दु:ख करीत बसायची. गेल्या काही दिवसांपासून ती खूप डिप्रेशनमध्ये होती. औषधांचाही काही परिणाम होत नसल्याने ती निराश झाली होती.

या प्रकरणात आफरीनच्या शेजाऱ्यांशीही चौकशी केली. पती-पत्नींमध्ये कोणताही वाद नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण उंच असायला हवं अशी इच्छा ती कायम व्यक्त करायची. लग्नापूर्वीही तिने उंची वाढविण्यासाठी अनेक औषधं घेतली होती पण कशाचाही काही परिणाम होत नव्हता.

First published: February 11, 2020, 3:02 PM IST

ताज्या बातम्या