Home /News /national /

हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये महाराष्ट्रातल्या 3 ट्रेकर्सचा मृत्यू, 10 जणांना वाचवण्यात यश

हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये महाराष्ट्रातल्या 3 ट्रेकर्सचा मृत्यू, 10 जणांना वाचवण्यात यश

हिमाचल (Himachal Pradesh) प्रदेशच्या किन्नौरमध्ये (Kinnaur) हिमवर्षाव (heavy snowfall ) झाल्यानं 3 ट्रेकर्सचा मृत्यू (3 trekkers die) झाला आहे.

    हिमाचल प्रदेश, 25 ऑक्टोबर: हिमाचल (Himachal Pradesh) प्रदेशच्या किन्नौरमध्ये (Kinnaur) हिमवर्षाव (heavy snowfall ) झाल्यानं 3 ट्रेकर्सचा मृत्यू (3 trekkers die) झाला आहे. दरम्यान 17 व्या बटालियन इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांची (ITBP)टीम शोध आणि बचाव कार्य करत आहे. धक्कादायक म्हणजे 13 जणांच्या ट्रेकर्स ग्रुपमध्ये 12 जण हे महाराष्ट्र राज्यातील आहेत. दोन दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh)बेपत्ता झालेले पर्यटक, कुली आणि मार्गदर्शकासह 17 ट्रेकर्सच्या (trekkers)ग्रूपमधील 11 जणांचा मृत्यू झाला होता. 13 ट्रेकर्स (महाराष्ट्रातील 12 आणि पश्चिम बंगालमधील 1) यांनी 17 ऑक्टोबरला रोहरू ते विलेज-बुरुआ, तेह-सांगला, जिल्हा-किन्नौरपर्यंत ट्रेकिंगला सुरुवात केली. बुरुआ कांडा वरच्या भागात बर्फ पडल्यामुळे हे सर्व ट्रेकर्स तिथे अडकले. हेही वाचा-  Skin care tips : चेहऱ्याची त्वचा ड्राय होण्यापासून वाचवतील या खास गोष्टी; हिवाळ्यात मिळेल फायदा समोर आलेल्या ताज्या अपडेटनुसार, यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जणांना रेस्क्यू करण्यात यश आलं आहे. जवळपास 15 हजार फुटांवर ट्रेकर्संचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शोधण्यासाठी आयटीबीपीची टीम आज घटनास्थळी पोहोचत आहे. एकूण ट्रेकर्स 13 तीन जणांचा मृत्यू राजेंद्र पाठक अशोक भालेराव दीपक राव 24 ऑक्टोबररोजी रेकॉन्ग पीओकडे नेले प्रसाद पेंडसे रजनीश दानराज सनसरे विले- बरुआ येथे पोहोचलेले 07 ट्रेकर्स महेश हेगडे विश्वास अडसुळे राकेश शर्मा कर्णधार प्रदीप रॉय पवन कृतिकार धनजय गावडे भावना देशमुख 13 जणांच्या या ट्रेकर्स ग्रुपमधले 12 ट्रेकर्स हे महाराष्ट्रातील आहेत. तर एक जण प्रदीप रॉय (कॅप्टन) कोलकाता येथील आहे. 17 ट्रेकर्सपैकी 11 जणांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी हवाई दलाने (Air Force) लमखागा (Lamkhaga Pass) खिंडीतून 11 मृतदेह बाहेर काढले. हा ग्रूप 18 ऑक्टोबर रोजी प्रचंड हिमवर्षाव (Snowfall)आणि खराब हवामानामुळे (Bad weather) बेपत्ता झाला होता. ट्रेकर्स बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय हवाई दलाने 20 ऑक्टोबर रोजी बचाव कार्य सुरू केले. असं सांगण्यात येत आहे की, हे ट्रेकर्स 14 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील उत्तरकाशीला लागून असलेल्या हर्षिल येथून हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये चित्कुलसाठी रवाना झाले होते. पण ते 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान लमखागा खिंडीजवळून बेपत्ता झाले. हेही वाचा- पत्नीच्या औषधांची रक्कम भरण्याचा निरोप येताच पतीनं उचललं टोकाचं पाऊल हे लोक होते टीममध्ये दिल्लीच्या अनिता रावत (38), पश्चिम बंगालचे मिथुन दारी (31), तन्मय तिवारी (30) , विकास मकल (33) सौरभ घोष (34) सावियन दास (28), रिचर्ड मंडल (30) सुकन मांझी (43) अशी टीम सदस्यांची नावे आहेत. तर स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख देवेंद्र (37), ज्ञानचंद्र (33) आणि उपेंद्र (32) अशी आहे, जे उत्तरकाशीतील पुरोलाचे रहिवासी आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Himachal pradesh

    पुढील बातम्या