निसर्गाने अडवले पण भारतीय जवान ठरले देवदूत, भीषण बर्फवृष्टीतही महिलेने जिप्सीत दिला बाळाला जन्म

निसर्गाने अडवले पण भारतीय जवान ठरले देवदूत, भीषण बर्फवृष्टीतही महिलेने जिप्सीत दिला बाळाला जन्म

आर्मीचे जवान देवदुतासारखे या महिलेच्या मदतीला धावून आले. आर्मीच्या जिप्सीमध्येच या महिलेने गोंडस चिमुकलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली आहे.

  • Share this:

श्रीनगर, 2 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे. या परिस्थितीत कुपवाड्यातील एका गावामध्ये राहणाऱ्या महिलेला अचानक प्रसुती कळा सुरू झाल्या. पण बर्फवृष्टी होत असल्याने रुग्णवाहिकेची सेवा मिळाली नाही. अशा परिस्थितीत आर्मीचे जवान देवदुतासारखे या महिलेच्या मदतीला धावून आले. आर्मीच्या जिप्सीमध्येच या महिलेने गोंडस चिमुकलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली आहे.

1 फेब्रुवारीला पहाटे सव्वाचार वाजताच्या दरम्यान काश्मिरमध्ये तुफान बर्फवृष्टी होत होती. त्यावेळी कालारुस कंपनी कमांडरला एका आशा वर्करचा एमर्जन्सी कॉल आला. नारीकूटमध्ये राहणाऱ्या एका गरोदर महिलेला अचानक प्रसुती कळा सुरू झाल्या आहेत, पण बर्फवृष्टीमुळे रुग्णवाहिका मिळत नसल्याचे आशा वर्करने सांगितले. अशा कठीण परिस्थितीत आर्मीने तत्परता दाखवत महिलेच्या प्रसुतीसाठी तात्काळ आर्मीच्या जिप्सीसोबत एक मेडिकल टीम कारिकूटला पाठवली.

आर्मीच्या जिप्सीतून महिलेला रुग्णालयात घेऊन जाताना तिची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे आशा वर्करने रस्त्याच्या कडेला गाडी उभी करण्याची विनंती केली. कमी दृश्यमानता आणि बर्फवृष्टी होत असतानादेखील आर्मीच्या मेडिकल टीमने जिप्सीमध्येच महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला आणि आईने एका मुलीला सुखरुप जन्म दिला.

(वाचा - पोलिओ लस देताना प्लॉस्टिकचा तुकडा गेला बाळाच्या पोटात, यवतमाळनंतर पंढरपूरमध्येही धक्कादायक प्रकार)

गोंडस मुलीच्या जन्म झाल्याचे पाहून त्याठिकाणी उपस्थित असलेल्या आशा वर्कर आणि आर्मीच्या मेडिकल टीममध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यावेळी बाळाच्या वडिलांही अश्रू अनावर आले. बाळाचे वडील गुलाम रबानी हे मजूर आहेत. कठीण परिस्थितीत आपल्या मुलीचा आर्मीच्या मदतीने जन्म झाल्याने त्यांनी अतिशय आनंदी असल्याची भावना व्यक्त केली आहे.

(वाचा - रात्री उशिरापर्यंत 2 मुलींसह महिलेला पोलीस ठाण्यात बसवणे पोलिसांना भोवले, द्यावा लागला 1 लाखांचा दंड)

बाळाला जन्म दिल्यानंतर महिला आणि तिच्या बाळाला कालारुस रुग्णालयात दाखल करण्यात आले. कंपनी कमांडरने गुलाम रबानी यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. तसंच त्यांनी आर्मी मेडिकलवरील आत्मविश्वासाबद्दल आणि कठीण परिस्थितीत निर्णायकपणा दाखवल्याबद्दल आशा वर्कर सादीया बेगम यांना सन्मानित केले. कालारुस रुग्णालयातील डॉक्टरांनी विनंती केल्यामुळे या रुग्णालयाचे बीएमओ डॉ. अशरफ यांना रुग्णवाहिकेसाठी अँटी स्किड चेन देण्यात आली. अँटी स्किड चेन चाकांना लावल्यामुळे बर्फवृष्टीत ती रस्त्यावरुन धावू शकते. त्यामुळे यापुढे सर्व हवामान परिस्थितीत रूग्णवाहिकेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी रुग्णालय सक्षम राहील.

Published by: Karishma Bhurke
First published: February 2, 2021, 1:57 PM IST

ताज्या बातम्या