Home /News /national /

राजधानीत पावसाचं धूमशान; विमानतळावरील धावपट्टीही पाण्याखाली, 5 विमानांचे बदलले मार्ग

राजधानीत पावसाचं धूमशान; विमानतळावरील धावपट्टीही पाण्याखाली, 5 विमानांचे बदलले मार्ग

आज दिल्लीला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आज दिल्लीला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

देशाची राजधानी दिल्लीला शुक्रवारी सायंकाळपासून मुसळधार पावसानं झोडपून (Heavy rainfall in delhi) काढलं आहे. कमी वेळात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे.

    नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: देशाची राजधानी दिल्लीला शुक्रवारी सायंकाळपासून मुसळधार पावसानं झोडपून (Heavy rainfall in delhi) काढलं आहे. कमी वेळात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. एवढंच नव्हे तर, मुसळधार पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (IGI Airport) काही भागांत पुरस्थिती निर्माण (Water logging at IGI airport) झाली आहे. परिणामी चार डोमेस्टीक आणि एक आंतरराष्ट्रीय विमानाचा मार्ग बदलण्यात आला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल क्रमांक 3 वर सर्वाधिक पाणी साचलं आहे. या घटनेनंतर विमानतळ प्रशासनाकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच विमानतळाच्या धावपट्टीवरील पाणी काढून टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांची एक टीम त्याठिकाणी पोहोचली असून धावपट्टीवरील पाणी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच दिल्लीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 4 राष्ट्रीय आणि 1 आंतरराष्ट्रीय विमानाचे मार्ग बदलण्यात आले आहे. संबंधित विमानं जयपूर आणि अहमदाबाद विमानतळाकडे वळवण्यात आल्याची माहितीही विमानतळ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. हेही वाचा-उत्तराखंडमध्ये निसर्गाचा प्रकोप, डोंगरांवरून कोसळणाऱ्या दगडांमुळे हायवे ठप्प शिवाय राजधानी दिल्लीत जागोजागी पाणी साचल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, आज दिवसभर ढगाळ हवामानासह मुसळधार पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे. आज दिल्लीला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत असल्यानं दिल्लीतील तापमानात घट झाली आहे. दिल्लीतील तापमान सरासरी तापमानापेक्षा 3 ते 4 अंशांनी खाली पोहोचलं आहे. हेही वाचा-माजी CMच्या मेहुणीची वाईट अवस्था; फुटपाथावर राहून सुरुये जगण्याचा संघर्ष मुसळधार पावसामुळे दिल्लीतील मोती बाग, आरकेपुरम, महिपालपूर, मधु विहार, खानपूर-देवली, मुनरिकासह अनेक भागात वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं बस आणि ऑटो देखील पावसाच्या पाण्यात अडकून पडल्या आहेत. याशिवाय मेट्रो स्टेशनच्या बाहेर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं लोक विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi, Rain fall

    पुढील बातम्या